Tuesday, February 18, 2025
HomeमानिनीMonsoon And Pedicure : पावसाळ्यात पेडीक्युअर केल्याने वाढतो इन्फेक्शचा धोका

Monsoon And Pedicure : पावसाळ्यात पेडीक्युअर केल्याने वाढतो इन्फेक्शचा धोका

Subscribe

पायांचे सौंदर्य राखण्यासाठी पेडीक्यूअर केले जाते. महिला आवर्जून पायांचे पेडीक्यूअर करून घेतात. पण, पावसाळ्यात पेडीक्यूअर करणे योग्य समजले जात नाही. कारण अनेक पार्लरमध्ये हायजीनकडे व्यवस्थित लक्ष दिले जात नाही. परिणामी, पेडीक्यूअर करताना पायांमध्ये फंगल इन्फेक्शन होऊ शकते. त्यामुळे जाणून घेऊयात पावसाळ्यात पेडीक्युअर करताना कशी काळजी घ्यायची,

पावसाळ्यात वातावरण दमट असल्याने बक्टेरीया वाढीसाठी हा उत्तम काळ असतो. त्यामुळे पार्लरमधील उपकरणे स्वच्छ आहेत का नाही याची खात्री करा. याने इन्फेक्शन पासून दूर राहाल.

जर तुम्हाला पार्लरमधील हायजीनबद्दल शंका असेल तर यावर सर्वात सोपा उपाय म्हणजे पावसाळ्यात पेडीक्यूअर घरीच करा. याने कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शनचा धोका निर्माण होणार नाही.

पावसाळ्यात तुम्ही फिश पेडीक्युअर करणे टाळायला हवे. कारण फिश पेडीक्युअर करताना पायांचा संपर्क जास्त वेळ पाण्याशी येतो. पावसाळ्यात आधीच वातावरण दमट असते आणि त्यात जर तुम्ही पाय पाण्यात जास्त वेळ ठेवल्यास तुम्हाला इन्फेक्शचा धोका निर्माण होतो.

पेडीक्युअर करताना नखांचे क्यूटिकल काढू नये. जर तुम्ही नखांचे क्यूटिकल काढले तर अशाने पायांमध्ये बॅक्टेरीया जमा होऊ शकतात. ज्याने पायांमध्ये इन्फेक्शन होते.

पार्लरमध्ये पेडीक्यूअर करताना तुमचे तळवे जास्त घासले जाणार नाहीत याची काळजी घ्या. पेडीक्यूअर करताना तुमचे तळवे जास्त घासले गेले तर त्वचेला एक प्रकारचा संसर्ग होऊ शकतो.

 

 

 

हेही पाहा :


Edited By – Chaitali Shinde

Manini