असे म्हटले जाते की, आयुष्यात एकदाच लग्न होते. मात्र असे काही लोक असतात ज्यांचे लग्न दीर्घकाळ टिकत नाही. कोणत्या ना कोणत्या कारणास्तव आपल्या पार्टनरपासून विभक्त होतात. अशातच आयुष्य संपल्यासारखे त्या वेळेस वाटते. परंतु स्वत:ला सांभाळून पुढे जाणे अत्यंत गरजेचे असते. त्यामुळे लोक दुसऱ्या लग्नाचा विचार करतात. (Tips for second marriage)
दुसरे लग्नातवेळी तुम्हाला काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. पार्टनर सोबत ताळमेळ नसेल तर घर-परिवाराची जबाबदारी सांभाळणे तेवढे सोपे नसते. वास्तविकरित्या दुसरे लग्न टिकवणे पहिल्या लग्नाच्या तुलनेत अधिक मुश्किल आहे. मात्र तुम्ही पुढील काही लहान-मोठ्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर दुसरे लग्न सुद्धा यशस्वी होऊ शकते.
खुलेपणाने बोला
दुसरे लग्न यशस्वी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे दोन्ही पार्टनरमध्ये खुलेपणाने संवाद व्हायला हवा. जेव्हा तुम्ही स्पष्टपणे एखादी गोष्ट पार्टनरसमोर ठेवता तेव्हा त्याला सुद्धा तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे हे कळते. तुमच्या त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत हे कळतात. त्याचसोबत तुम्हाला एखादी गोष्ट सतावत असेल तर त्याबद्दल ही खुलेपणाने बोला.
रिअलिस्टिक गोल सेट करा
बहुतांशवेळा लग्नासाठी दोन्ही पार्टनरच्या आपल्या-आपल्या अपेक्षा असतात. मात्र दुसऱ्या लग्नात काही प्रकारची आव्हाने असतात. त्यामुळे हे गरजेचे आहे की, तुम्ही रिअॅलिस्टिक गोल्स सेट करा. कधीकधी दुसऱ्या लग्नाची तुलना आपल्या पहिल्या किंवा अन्य कपल सोबत करणे टाळा. यामुळे शारीरिक आणि मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो.
सन्मान करा
दुसऱ्या लग्नावेळी विश्वास आणि प्रेम कामय टिकवून ठेवण्यास वेळ लागतो. त्यासाठी नाते यशस्वी करण्यासाठी तुम्ही सर्वात प्रथम एकमेकांचा सन्मान करा. जेव्हा पार्टनर एकमेकांचा सन्मान करतात किंवा एकमेकांचे कौतुक करता तेव्हा नात्यावर सकारात्मक परिणाम होतो.
एकत्रित वेळ घालवा
दुसऱ्या लग्नावेळी दोन्ही पार्टनर एकमेकांसोबत लगेच कंम्फर्टेबल होत नाही. अशातच एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ द्या आणि घ्या. जेव्हा तुम्ही एकत्रित उत्तम वेळ घालवता तेव्हा एकमेकांना उत्तम पद्धतीने समजून घेता येईल. त्याचसोबत तुम्ही भावनिकरित्या जोडले जाऊ शकता.
जबाबदाऱ्यांबद्दल चर्चा करा
बहुतांश लोक आपला एकटेपणा दूर करण्यासाठी नव्हे तर जबाबदाऱ्या निभावण्यासाठी दुसरे लग्न करतात. दुसरे लग्न यशस्वी करण्यासाठी हे गरजेचे असते की, तुम्ही लग्नाच्या आधीच जबाबदाऱ्यांबद्दल बोला. जेव्हा तुम्ही असे करता तेव्हा नात्यात वाद कमी होण्याची शक्यता निर्माण होते.
हेही वाचा- वयाने मोठ्या असलेल्या पुरुषाबरोबर रिलेशनशिपचे फायदे