घरताज्या घडामोडीsolo traveling-एकट्यानेच प्रवासाला निघताय? मग घ्या ही काळजी

solo traveling-एकट्यानेच प्रवासाला निघताय? मग घ्या ही काळजी

Subscribe

गेल्या काही वर्षांपासून सोलो ट्रॅव्हलिंगचे म्हणजे एकट्याने प्रवास करण्याचा ट्रेंड वाढलाय. सोलो ट्रॅव्हलिंगमुळे आत्मविश्वास तर वाढतोच त्याचबरोबर एकट जगायचं कसं हे देखील शिकायला मिळतं.

प्रवासाचा आपला असा वेगळाच आनंद असतो. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेल्याने मूड तर बदलतोच शिवाय हवापालट झाल्याचे समाधानही मिळते. यामुळे साधारणत अनेकजणांना मित्र किंवा कुटुंबीयांबरोबर प्रवास करायला आवडतं. पण गेल्या काही वर्षांपासून सोलो ट्रॅव्हलिंगचे म्हणजे एकट्याने प्रवास करण्याचा ट्रेंड वाढलाय. सोलो ट्रॅव्हलिंगमुळे आत्मविश्वास तर वाढतोच त्याचबरोबर एकट जगायचं कसं हे देखील शिकायला मिळतं. यामुळे तरुणांमध्ये व मध्यमवयीन व्यक्तींमध्ये हा ट्रेंड वाढलेला दिसतोय. पण एकट्याने भटकंती करणं हे वाटतं तितके सोपही नाही. कारण तुम्हांला कधी कोणाची गरज पडेल हे सांगता येत नाही. यामुळे या लेखातून सोलो ट्रॅव्हलिंग करताना काय काळजी घ्यायला हवी ते आपण बघूया.

सर्वात आधी ज्या ठिकाणी जाण्याचा प्लान करत असाल तिथली संपूर्ण माहिती मिळवा. तसेच तुम्ही ज्या हॉटेलमध्ये राहणार असाल त्याची व त्याच्या आजूबाजूच्या परिसराची महिती मिळवा. जेणेकरून तुम्हांला अपेक्षित ठिकाण लवकर भेटतील. तसेच तुम्ही शहरात नवीन आहात हे ओळखून भामटे तुम्हांला लूटणारही नाहीत.

- Advertisement -

पॅकींग करताना नीट काळजी घ्या. उगाच फाफट पसारा न घेता मोजक्याच पण गरजेच्या आवश्यकतेनुसारच वस्तू व सामान घ्या. पण तिथे तुम्ही एकटेच असणार आहात हे लक्षात ठेवा आणि त्यानुसार सामान घ्या. पैसे किंवा मौल्यवान वस्तू एकाच बॅगेत न ठेवता वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा.

तसेच तुमच्या इतर सामानाबरोबरच सेफ्टी किट, मेडीसिन कीट ठेवायला विसरू नका. तुम्ही एकटेच ट्रॅव्हलिंग करत आहात यामुळे तुमची सुरक्षा तुमच्याच हाती आहे हे लक्षात असू द्या. सेफ्टी किटमध्ये चाकू, पेपर स्प्रे, दोरी, नेल कटर, माचिस, स्क्रू ड्रायव्हर, टॉर्च, लायटर यासारख्या वस्तू आवर्जुन ठेवाव्यात. कॅमेरा, डायरी पेन , शिटी, तंबू हे तर सोलो ट्रॅव्हलसाठी आवश्यक आहे.

- Advertisement -

तसेच तुम्ही कुठे फिरायला जात आहात ते कुटुंबीयांना किंवा जवळच्या व्यक्तीला सांगून जावे. तेथील पताही सांगावा. त्याचबरोबर स्वत:बरोबर आयडी ही ठेवावे. ज्या भागात तुम्ही जाणार असाल तेथील अत्यावश्यक विभागाचा संपर्क क्रमांकही घ्यावा. म्हणजे गरजेच्या वेळी तुम्हांला वेळेवर मदत मिळू शकते.

सोलो ट्रॅव्हलिंग तुम्हांला आनंद देत असेल तरी त्यात असलेले धोक्याच्या संभावनांकडे दुर्लक्ष करू नये. तुम्ही नवीन आहात व एकटेच आहात हे कोणालाही कळणार नाही एवढा स्मार्टनेस तुम्हांला ठेवावा लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -