Tuesday, February 18, 2025
HomeमानिनीHealth Care Tips : हेल्दी आणि फिट राहण्यासाठी टिप्स

Health Care Tips : हेल्दी आणि फिट राहण्यासाठी टिप्स

Subscribe

बदलती लाइफस्टाइल, धावपळीचे आयुष्य, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, कामाचा ताण यामुळे अनेकांना शारीरिक आजार जडत आहेत. शारीरिक आजारांसह त्वचा आणि केसांच्या समस्या तर अगदी सामान्य झाल्या आहेत. अशावेळी शरीराला हेल्दी आणि फिट ठेवण्यासाठी तुम्ही रोजच्या सवयींमध्ये काही बदल करायला हवेत. या सवयींच्या माध्यमातून शरीर हेल्दी आणि फिट ठेवण्यासाठी नक्कीच मदत होऊ शकते.

  • बिझी लाइफस्टाइलमध्ये रोजच्या सवयी बदलणे थोडे आव्हानात्मक असू शकते. पण, तुम्ही हळूहळू सवय केल्यास नक्कीच यामुळे शरीर हेल्दी आणि फिट ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
  • रोजच्या रुटीनमध्ये शारीरिक व्यायामाचा समावेश करावा. हेल्दी आणि फिट राहण्यासाठी तुम्ही योगासनांची मदत घेऊ शकता. योगासाठी वेळ काढायला जमत नसेल तर किमान 30 मिनिटे चालावे.
  • व्यायामासोबत आहाराकडे लक्ष द्यावे. दुपारचे किंवा रात्रीचे जेवण वगळू नये. कारण जेवण वगळल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे वेळेवर जेवावे. आहारात फायबर, व्हिटॅमिन्स आणि इतर पोषक घटक असतील याची काळजी घ्यावी.
  • व्यायाम, आहारासोबत शरीर हेल्दी आणि फिट ठेवण्यासाठी पुरेशी झोप घ्यावी. आजकाल स्क्रीन टाइम वाढत असल्याने त्याचा झोपेवरही दिर्घ परिणाम होत आहे. अनेकांना निद्रानाशेची समस्या जाणवत आहे. अशा परिस्थितीत हेल्दी आणि फिट राहण्यासाठी किमान 7 ते 8 तासांची मदत घ्यावी.
  • सकारात्मक राहणे महत्वाचे आहे. सकारात्मक आणि नकारात्मक भावनांचा आपल्या आरोग्यावर दिर्घ परिणाम होत असतो. नकारात्मक भावनांमुळे तणाव निर्माण होतो. त्यामुळे सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करावा.
  • भरपूर पाणी प्यावे. आपले शरीर 70% पाण्याने व्यापलेले आहे. पाणी कमी प्यायल्याने शरीरावर दिर्घ परिणाम होतो. शारीरिक व्याधी जडू शकतात. त्यामुळे पुरेसे पाणी प्यावे.

 

 

 

हेही पाहा –

Manini