वरण – भात त्यावर तूपाची धार म्हणजे कित्येकजणांसाठी स्वर्गसुख असते. तूपामुळे केवळ पदार्थाची चव वाढत नाही तर आरोग्यासाठीही तूपाचे सेवन फायदेशीर मानले जाते. तूपामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात आढळतात. याशिवाय तूपात हेल्दी फॅट असतात. ज्यामुळे गंभार आजांराचा धोका कमी होतो. त्यामुळे रोजच्या आहारात तूपाचे सेवन केले जाते. तूपाच्या सेवनाने केसांचे आणि त्वचेचे आरोग्य सुधारले जाते. जवळपास 5 हजार वर्षापूर्वीपासून तूपाचा वापर केला जातो. आज तर कित्येक देशांमध्ये तूप मुख्य पदार्थ म्हणून वापरला जातो. हल्ली भेसळयुक्त तूप मिळत असल्याने महिला घरीच तूप बनवण्याला प्राधान्य देतात. पण, घरी बनवलेले तूप साठवणे थोडे कठीण असते. त्यामुळे जाणून घेऊयात, तूप फ्रेश आणि चवदार ठेवण्यासाठी कोणत्या टिप्स वापरायला हव्यात,
फ्रिजरमध्ये ठेवा –
तूप दिर्घकाळासाठी साठवले जाऊ शकते. यासाठी तुम्हाला तूप कमीत कमी वर्षांभरासाठी फ्रीजमध्ये साठवावे लागेल. पण, तूप फ्रीजमध्ये स्टोअर करताना त्यावर तारीख लिहायला विसरू नका. ज्यामुळे तुम्हाला वर्ष झाल्याचे लक्षात येईल. या टिपमुळे तूपाची चव बिघडत नाही.
भांडे मोठे वापरा –
गायीच्या तुपाचे भांडे वारंवार उघडून बंद केल्याने त्यावर फ्रीजमधील ओलाव्याचा जास्त परिणाम होतो. यामुळे तूप खराब होऊ शकते. यावर उपाय म्हणजे तूप मोठ्या भांड्यात ठेवा किंवा तुम्ही वापरात येणाऱ्या तुपासाठी एक छोटे कंटेनर वापरू शकता. या टिपमुळे तूपाची चव बिघडत नाही.
योग्य कंटेनर –
ज्या कंटेनरमध्ये तूप साठवत आहात, त्याचे मटेरीअल योग्य असायला हवे. कारण जारचे मटेरियल गायीच्या तुपाचे शेल्फ लाइफ वाढवू शकते. फ्रीजरमधील तूपासाठी प्लास्टिक कंटेनर वापरायला हवा, दिर्घकाळासाठी तूप साठवून ठेवायचा असेल तर त्यासाठी काचेचा कंटेनर वापरायला हवा. दैनंदिन वापरातील तुपासाठी स्टिलचे कंटेनर वापरणे योग्य ठरेल.या टिपमुळे तूपाची चव बिघडत नाही आणि फ्रेशही राहते.
देशी तुप कसे साठवायचे –
देशी तूप जास्त काळ तुम्ही साठवून ठेवू शकता. फक्त साठवण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहित असायला हवी. तूप कायम हवाबंद डब्यात साठवायला हवे. यामुळे हवेतील घाण तूपात मिक्स होत नाही. तूपाची साठवण शक्य असल्यास काचेच्या बरणीत करावी.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde