नवीन कपल्स जेव्हा पहिल्यांदा आई वडील होतात तेव्हा एक भावना प्रत्येक कपल्ससाठी एक वेगळाच अनुभव देऊन जाते. तसेच तो आनंद त्यांच्यासाठी एक आनंददायी व अविस्मरणीय क्षण असतो. पण काही गोष्ट त्या कपल्सचे आयुष्य सुद्धा बदलून टाकतात. आता केवळ ते कपल्स नसतात तर पालक झालेले असतात. एका लहान जीवाची जबाबदारी त्यांच्यावर आलेली असते. अशावेळी काही महत्त्वाच्या गोष्टी माहित असणे गरजेचे असते.
जर काही गोष्टी माहित नसतील तर त्याचा वाईट परिणाम लहान मुलांच्या संगोपनावर होतो. तसेच अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणूनच खास विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. अशा काही टिप्स आता आपण पाहणार आहोत ज्या पहिल्या आई बाबा होणाऱ्या कपल्सने लक्षात ठेवायला हव्यात आणि त्यानुसार वागायला हवे.
पुढील टिप्स करा फॉलो-
- आई बाबांच्या सानिध्यात वाढलेली मुलं शिस्तबद्ध असतात.
- ज्या मुलांचे त्यांच्या पालकांशी मजबूत संबंध आहेत ते अधिक आत्मविश्वासाने वागतात.
- तसेच भविष्यात त्यांच्या करिअरवर सकारात्मक परिणाम झालेला दिसून येतो.
- पालकांसोबत भावनिक बंध असल्याने मुलांना चांगले communication तसेच त्यांच्यात कौशल्य, भावनिक बुद्धिमत्ता चांगली राहण्यास मदत होते.
- यामुळे त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
या गोष्टींकडे सर्वांधिक लक्ष द्या-
- मुलांना वेळ द्या. त्यांच्यासोबत तुम्ही जितका चांगला वेळ घालवाल तेवढं बॉंडिंग वाढेल.
- मुलांना काय वाटतं? मुलांसाठी काय महत्वाचं आहे? ते ओळखा. या कडे जास्त लक्ष द्या.
- घरी आल्यानंतर मुलाला महत्व द्या.
- जेवायला बाळाला भरवताना त्याच्यासोबत छान गप्पा मारा.
- बाळाच्या आजूबाजूला आई असणं ही भावना बाळासाठी खूप सुखवणारी आहे.
- मुलांसोबत ‘बेड टाईम’ हा खास क्षण असतो.
- तुमच्या झोपण्याच्या ठिकाणी तुम्ही मनाने आणि शरीराने असणं गरजेचं आहे. यावेळी कामाचा विचार नको.
हेही वाचा :