Friday, September 22, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी पन्नाशीत पंचविशीचा लूक हवाय? मग वापरा 'या' टीप्स

पन्नाशीत पंचविशीचा लूक हवाय? मग वापरा ‘या’ टीप्स

Subscribe

वाढतं वय रोखणं हे कोणाचाही हातात नाही. मात्र वाढत्या वयाबरोबर त्वचेतील बदल आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या नक्कीच कमी करता येतात. वयाच्या पन्नाशीनंतर शरारीतील हार्मोन्समध्ये वेगाने बदल होतात, याचा तुमच्या त्वचेवर खूप परिणाम दिसून येतो. त्वचेवर म्हाताऱ्या माणसांसारख्या मोठ्याप्रमाणात सुरकुत्या दिसतात. म्हणून सर्वसामान्य महिलांना बॉलिवूड अभिनेत्री वयाच्या 50 व्या वर्षीही आपली त्वचा कशी तरुण ठेवतात हे जाणून घ्यायचे असते.

तुम्हाला आम्ही वाढत्या वयाबरोबर त्वचेची योग्य काळजी कशी घ्याची याच्या टिप्स देणार आहोत.
त्वचा तज्ज्ञांच्या माहिती आधारे ही माहिती देत आहे.

त्वचेला एक्सफोलिएट करा

- Advertisement -

१) त्वचेला एक्सफोलिएट करणे खूप महत्त्वाचे आहे. कारण याचे अनेक फायदे आहेत.

२) तुम्ही त्वचेवर घरगुती स्क्रबचा वापर करु शकता. त्वचेच्या प्रकारानुसार हा स्क्रब तयार करू शकता. यात तांदळाचे पीठ वापरा कारण हे अँटी- एजिंग आहे.

- Advertisement -

३) स्क्रबिंगमुळे त्वचेवरील मृत त्वचेचा थर निघून जातो. अनेकदा मृत त्वचेमुळे संपूर्ण त्वचा काळी आणि कोरडी वाटते. यावेळी तुम्ही त्वचेला योग्य प्रकारे एक्सफोलिएट केलात तर तुमची समस्या दूर होईल.

४) स्क्रबिंगमुळे त्वचेतील ब्लड सर्कुलेशन वाढते. यामुळे केवळ तुमच्या त्वचेचा रंगचं उजळत नाही तर त्वचा घट्ट होते आणि तुम्ही अधिक तरुण दिसून लागता.

५) स्क्रबिंग केल्याने त्वचा डीप क्लीन होते, त्यामुळे चेहऱ्यावर मुरमं येत नाही.

अशाप्रकारे वापर फेस पॅक

१) तुमची त्वचा तेलकट असो वा कोरडी, फेस पॅक वापरणे गरजेचे आहे. फेसपॅकमुळे त्वचेवरील ओपन फोर्स बंद होतात आणि त्वचा घट्ट वाटते.

२) वाढत्या वयाबरोबर त्वचेतून कोलेजन कमी होण्यास सुरुवात होते, यामुळे त्वचा सईल वाटू लागते तसेच चेहऱ्यावर सुरकुत्या आणि रेचक दिसू लागतात. म्हणून जेव्हा तुम्ही फेस पॅक निवडता तेव्हा ते तुमच्या त्वचेतील कोलेजनचे उत्पादन वाढवणारे असावे.

३) तुम्ही त्वचेवर दूध आणि मध घालून फेस पॅक तयार करून लावू शकता. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही कच्च्या दुधाचा फेस पॅक बनवा आणि जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्हाला मधाचा फेस पॅक तयार करावा. दोन्ही पदार्थ तुमच्या त्वचेतील कोलेजनचे उत्पादन वाढवतात.

४) फेसपॅक लावण्याची उत्तम वेळ म्हणजे रात्र. रात्री झोपण्यापूर्वी त्वचा स्क्रब करा आणि नंतर फेसपॅक लावा. हे सर्व करण्याआधी तुम्ही चेहऱ्यावरील मेकअप पूर्ण काढला पाहिजे, त्यासाठी तुम्ही गुलाबजल वापरू शकता.

मॉइस्चराइजर वापर करा

वाढत्या वयात वॉटर बेस्ड प्रोडक्ट्सचा वापर करणे फायदेशीर असते. यात चेहऱ्यावर मॉइश्चरायझरचा वारंवार वापर करायला हवा. यामुळे तुमची त्वचा हायड्रेटही राहते आणि चमकतेही.


(टीप्स- चेहऱ्यावर किंवा त्वचेवर काहीही वापरण्यापूर्वी तुम्ही तुमच्या आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -

Manini