उन्हाळ्यात कशी राखाल केसांची निगा? इथे वाचा…

care of hair
केसांच्या समस्यांवर आयुर्वेदिक तेल

उन्हाळ्याच्या दिवसात केसांचे अधिक नुकसान होत असते. उन्हासोबत घाण, कचरा व घामामुळे केस तेलकट होतात. या दिवसात केसांची काळजी कशाप्रकारे घ्यावी याबाबत आपण काही टिप्स पाहणार आहोत.
वेणी बांधावी – उन्हाळ्याच्या झळा आणि आर्द्रतेपासून केसांचे रक्षण करण्यासाठी ते घट्ट बांधून ठेवणे अधिक चांगले. वेगवेगळ्या प्रकारच्या वेण्यांनी तुम्ही उन्हाळ्यात स्टाईलिश देखील राहू शकता त्याचबरोबर तुमच्या केसांचे नुकसान ही कमी होते.

वेणी बांधावी – उन्हाळ्याच्या झळा आणि आर्द्रतेपासून केसांचे रक्षण करण्यासाठी ते घट्ट बांधून ठेवणे अधिक चांगले. वेगवेगळ्या प्रकारच्या वेण्यांनी तुम्ही उन्हाळ्यात स्टाईलिश देखील राहू शकता त्याचबरोबर तुमच्या केसांचे नुकसान ही कमी होते.

braid
वेणी बांधावी

केस झाकून ठेवणे – केसांचे थेट सूर्यप्रकाशामुळे नुकसान होते त्यामुळे त्यांना स्कार्फच्या सहाय्याने झाकून ठेवा. त्याचबरोबर केस झाकण्यासाठी हॅटचा वापर करा. यामुळे केसांचा किरणांपासून बचाव करु शकतो.

cover the hair
केस झाकून ठेवणे

सतत केस धुऊ नये – वारंवार केस धुतल्याने तेलाच्या निर्मितीचे कार्य वाढते परिणामी ते धुण्याची गरज वाढते. त्यामुळे केवळ अतिरिक्त तेल निघेल इतकेच त्यांना स्वच्छ ठेवा. सतत केस धुणे टाळा.

wash the hair
जास्त केस धुऊ नये

स्विमिंगपूर्वी केस ओले करावे – उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही स्विमिंगचा पर्याय निवडणार असाल तर केसांकडे लक्ष द्या. स्वच्छ पाण्याने केस ओले करा. यामुळे क्लोरिन आणि इतर केमिकल्स शोषून घेण्याचा धोका कमी होतो. तसेच स्विमिंगनंतरही केस स्वच्छ धुवावे.

hair wash
स्विमिंगपूर्वी केस ओले करावे

हेअर ब्रश टाळणे – बारीक दातांच्या फणीने केस विंचरणे टाळा. यामुळे केस तुटले जातात. मोठ्या दाताच्या फणीने केस विंचरल्यास त्यातील जटा सोडवणे सोपे होते. तसेच केस ओले असताना विंचरू नये.

hair brush
कंगवा

ग्रीन टीचा वापर करा – नेहमीप्रमाणे केस धुतल्यानंतर शेवटी ग्रीन टी ने केस धुवावे. ग्रीन टी मुळे केस वाढतात आणि त्यात असलेल्या सनस्क्रीन गुणधर्मांमुळे उन्हापासून केसांचे संरक्षण होते.

green tea
ग्रीन टी

जास्वंदाचा धुण्यासाठी वापर करा – शॅम्पू आणि कंडिशनरने केस धुण्यापूर्वी जास्वंदीची फुले पाण्यात उकळवा व त्या पाण्याचा वापर केस धुण्यासाठी करा.

jaswand
जास्वंद

बियरने केस धुवा – बियरमुळे केस व त्वचा चमकदार होते. पाण्यात अर्धा कप बीयर घालून केस धुवा यामुळे केस चमकदार होतात.

beer
बियर

ब्लॅक टी – ब्लॅक टीमध्ये असलेल्या कॅफेनमुळे केसांची वाढ होते. उन्हाळ्यात केस धुण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

Black Tea
ब्लॅक टी