Sunday, January 19, 2025
HomeमानिनीBeauty Tips : हात सॉफ्ट ठेवण्यासाठी टिप्स

Beauty Tips : हात सॉफ्ट ठेवण्यासाठी टिप्स

Subscribe

हिवाळ्यात थंड हवामानामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज होऊ लागते. यामुळे हात खराब होतात आणि हात वारंवार धुवावे लागतात. थंड वारा आणि आर्द्रतेच्या कमीमुळे त्वचेची नाजूकता वाढते. त्यामुळे हिवाळ्यात हात सॉफ्ट ठेवणे थोडे अवघड असते. आज आपण जाणून घेऊयात, हात सॉफ्ट ठेवण्यासाठी कोणत्या टिप्स वापरू शकतो.

ग्लिसरीन आणि गुलाबपाणी 

ग्लिसरीनमध्ये गुलाबपाणी मिसळून हातांना लावा. यामुळे त्वचा मऊ आणि हायड्रेट राहील.

सेंद्रिय तेल

हाताला खोबरेल तेल, बदाम तेल किंवा ऑलिव्ह तेल हातांना लावू शकता. झोपण्यापूर्वी हातांना मसाज केल्याने त्वचा सॉफ्ट राहते.

हात धुतल्यावर मॉइश्चरायझर लावा

मॉइश्चरायझरमुळे आपली त्वचा हायड्रेट राहते. हिवाळ्यात आपल्याला मॉइश्चरायझरची जास्त गरज असते. अशावेळी हात धुतल्यावर मॉइश्चरायझर लावणे गरजेचे आहे. यामुळे हात कोरडे होणार नाहीत.

हातमोजे वापरा

हिवाळयात वातावरण थंड असल्यामुळे आपले हात सहजपणे कोरडे पडतात. बाहेर जाताना किंवा घरात काम करताना तुम्ही हातमोजे वापरू शकता. हातमोजे वापरल्याने तुमचे हात थंड देखील पडणार नाही.

दूध आणि मध पॅक

कोमट दूधात मध मिसळून हातांना लावा. कमीतकमी 15 मिनिटे ठेवून नंतर हात स्वच्छ पाण्याने धुवा.

स्क्रबग करा

साखर आणि ऑलिव्ह ऑइल हे मिश्रण मिक्स करून हातांना लावून स्क्रब करून घ्या. या स्क्रबमुळे मृत त्वचा काढून टाकता मदत मिळते.

एलोवेरा जेल

एलोवेरा जेल हातांना नियमित लावल्यास त्वचा नैसर्गिकरित्या मॉइश्चराइज होते. नियमित एलोवेरा जेल हातांना लावल्यामुळे हात कोरडे देखील पडणार नाही.

भरपूर पाणी प्या

हिवाळ्यात थंडी असल्यामुळे आपण पाणी कमी पितो. याचा परिणाम आपल्या त्वचेवर देखील होतो. त्यामुळे त्वचा सहजपणे कोरडी होते. भरपूर पाणी प्यायल्याने या समस्या कमी होतात.

या टिप्सने तुमचे हात हिवाळ्यात सॉफ्ट राहतील.

हेही वाचा : Milk Cream : दुधाची साय चेहऱ्यावर लावण्याचे फायदे


Edited By : Prachi Manjrekar

 

Manini