Tuesday, February 18, 2025
HomeमानिनीDigestive health : प्रवास करताना पोट बिघडते?

Digestive health : प्रवास करताना पोट बिघडते?

Subscribe

प्रवास करायला अनेक जणांना आवडते. कित्येक जणांचा हा आवडीचा छंद असतो. पण, प्रवास करताना अनेकदा पोटाचे आरोग्य बिघडते. जसे, की अॅसिडीटी, बद्धकोष्ठता, जूलाब आदी समस्या जाणवतात. या समस्येमुळे संपूर्ण प्रवासाची मज्जाच निघून जाते. तुम्हालाही जर प्रवास करताना पोट बिघडण्याची समस्या जाणवत असेल तर बातमी तुमच्यासाठी. आज आम्ही तुम्हाला प्रवास करताना महत्त्वाचे असणारे खाण्यापिण्याचे काही नियम सांगणार आहोत. जे, तुम्ही प्रवास करताना पाळायला हवेत. या नियमांचे पालन केल्याने प्रवास करताना पोटाचे आरोग्य बिघडत नाही. जाणून घेऊयात हे नियम,

पाळा खालील नियम –

  • प्रवात करताना हेल्दी पदार्थ खा. तेलकट , मसालेदार पदार्थ खावू नका.
  • प्रवास करताना जर तुम्हाला वारंवार पोट बिघडण्याची समस्या जाणवत असेल तर रिकाम्या पोटी कॅफिनचे सेवन करू नका.
  • दररोज सूर्य नमस्कार घाला, हे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
  • रोज सूर्य नमस्कार घातल्याने पचनशक्ती सुधारते आणि पचन व्यवस्थित होते. प्रवास करतानाच नाही तुम्हाला असाही कधी पोट बिघडण्याचा त्रास होणार नाही.
  • प्रवास करण्याच्या आदल्या रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही नाभीमध्ये तेलही टाकू शकता, हा उपायही उत्तम मानला जातो. यामुळे चयापचय क्रिया सुधारण्यास मदत होते. परिणामी, पचनक्रिया सुधारते आणि गॅसची समस्या जाणवत नाही.
  • प्रवास करताना थंड पदार्थ खाणे टाळा. थंड पदार्थामुळे पचनक्रिया मंदावते. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यासाठी प्रवासात थंड पदार्थ खाणे टाळा.
  • प्रवास करताना हमखास फळे आणि दूधाचे सेवन केले जाते. पण, हे दोन्ही पदार्थ एकत्र खाणे योग्य मानले जात नाही. फळे लवकर पचतात तर दूधाला जास्त वेळ लागतो.
  • प्रवास करताना पदार्थ खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवून घ्यावेत.
  • अस्वच्छ हातांनी जेवल्यास पोट बिघडू शकते.त्यामुळे काहीही खाण्यापूर्वी हात स्वच्छ धूवायला विसरू नका.
  • प्रवासात पाणी भरपूर प्या.
  • पाणी प्यायल्याने शरीराचे पाण्याचे प्रमाण कमी होत नाही, ज्यामुळे तुमचे पोट बिघडणार नाही.

 

 

 

 

हेही पाहा –


Edited By – Chaitali Shinde

Manini