पावसाळ्यात घराचे छत गळतंय का? सिलिंगचे पापुद्रे निघालेत?

पावसाळा सुरू झाला असून अनेकवेळा छतातून पावसाचे पाणी गळते. तर भिंती ओलसर झाल्याने सिलिंगचे पापुद्रेही निघतात.

कधी पावसाचं पाणी घरांच्या छतामधून किंवा खिडकीतून आत यायला सुरूवात होते. त्यामुळे भिंतीना ओल धरते. तर कधी छत गळत असल्यामुळे फर्निचर खराब होणे अशा अनेक समस्या समोर येतात. कधी कधी भिंती ओल्या झाल्या की त्यांचा कुबट वासही येतो. पण जर पावसाळा सुरू होण्याआधीच काही उपाययोजना केल्या तर पावसाळ्यात या समस्या उ्दबवत नाहीत.

१) वॉटरप्रूफिंग वाढवा – पावसाळा सुरू होण्यापूर्वीच भिंती, बाल्कनी आणि छताला पडलेल्या भेगांची पाहणी करून घ्या. त्याआकारांच्या मापाचे पॉलीयूरेथेन, सिमेंट, थर्मोप्लास्टिक किंवा पीवीसी वॉटर प्रूफिंग करून घेणे.

२ पाण्यापासुन वाचण्यासाठी वॉटर प्रूफिंग पेंट किंवा सिलेंट स्प्रेची डबल कोटिंग करून घ्या. हे सगळे उपाय करून पाहा घरात पावसाचं थेंबही येणार नाही.

२) नाले आणि पाईप यांची स्वच्छता- घराच्या आत आणि बंद नाल्यामध्ये अनेक कीटाणु असतात. या कारणामुळे बाथरूम आणि सिंक मध्ये पाणी साचून तेओवरफ्लो व्हायला सुरूवात होते. पाणी साचुन राहिल्यामुळे दुर्गंधी येते. यासाठी प्रत्येक वेळी घराची स्वच्छता करावी. यावर उपाय म्हणजे, एक कप बेकिंग सोडा, एक कप टेबल मीठ आणि एक कप सफेद सिरका घेऊन त्याचे मिश्रण करून पाईप मध्ये टाका. आणि १५ मिनिट असेच राहुद्या. त्यानंतर गरम पाणी त्यात सोडा. तुमचा पाईप पुर्ण साफ होईल.

३) ओलाव्याचे ठिकाण जंतुरहित ठेवा- पावसाळ्यात घरातल्या ओलसर भागात माश्या आणि किटक मोठ्या प्रमाणात वाढतात. किचन प्लेटफॉर्म, टेबल, कपाटांच्या भिंती, फरशी यांवर ओलावा असतो. हे यामुळे ते नेहमी कोरडे करावे. त्यासाठी बाजारात मिळणाऱ्या रेडीमेड स्प्रेचा वापर करावा. पण तुम्ही घरगुती पध्दतीत स्प्रे बनवू शकता. यासाठी २५ टक्के सिरका आणि ७५ पानी घेऊन त्याचे मिश्रण करून त्यात सुगंधीत एसेंशियल तेल टाकून एकत्रित करा.

४) खाण्याचे पदार्थ खराब होण्यापासून वाचवा- पावसाळ्याच्या ऋतु मध्ये खाण्याच्या पदार्थ लवकर खराब होतात. . ते खराब होऊ नये म्हणुन प्लास्टिकच्या डब्या मध्ये ठेवण्या ऐवजी एयरटाइट काचेच्या कंटेनर मध्ये ठेवा. जंतुपासुन संरक्षण होण्यासाठी कपाटामध्ये कापूर, नेप्थलीन बॉल्स किंवा सिलिका जेलच पाऊच ठेवा. कडीलिंबांची पाने किचन मध्ये ठेवा त्याने जंतु होत नाहीत.

५) इलेक्ट्रिकल सिस्टमला सुरक्षित ठेवा- घरामध्ये (इलेक्ट्रिकल आउटलेट्स) तारा, लाइट्स, डोअरबेल्स आणि अलार्मला चांगल्या प्रकारे बांधून ठेवा. ज्यामुळे घरात शॉक-फ्री कनेक्शन राहील. घरात इलेक्ट्रीशियन बोलावून निट पडताळणी करून घ्या. चुकनही एखादी तार खुली असल्यास शॉक लागण्याची शक्यता आहे.

६) लाकडांची काळजी घ्या – पावसाळ्याच्या वातावरणात लाकडी वस्तु, फर्नीचर, स्टोरेज रुम, भिंती वरील पैनल हे खराब होण्याची शक्याता जास्त असते. यासाठी लाकडी वस्तु सुक्या कपड्याने पुसाव्यात. किंवा त्यांना वार्निश पेंट लावावा.

७) पडदे सुरक्षित ठेवा- या वातावरणात पडद्यांची काळजी घ्या. कव्हर किंवा प्लास्टिक बॅगमध्ये सुरक्षित कोरड्या ठिकाणी ठेवा.