तुमचे लग्न कसे छान होईल हे लग्नाच्या तारखेवर अवलंबून असते. तसेच आता थोड्या काही दिवसातच लग्नाचा हंगाम सुरु होणार आहे. लग्न हे घाईत करण्याची गोष्ट नाही आहे. लग्न करताना पुरेसा वेळ हवा तसेच ज्या ठिकाणी लग्न आहे त्या जागेवर पोचण्यापर्यन्त सर्वाना सोयीस्कर वेळ आहे का हे जाणून घेतले पाहिजे. लग्नाचा सीझन निवडताना नेहमी बजेट लक्षात ठेवा. खरं तर, प्रत्येक वर्षात काही वेळा असे असतात जेव्हा लोक लग्न करणे शुभ मानतात. अशा वेळी लग्न केल्यास जास्त खर्च करावा लागू शकतो. जर का लग्नाचे ठिकाण महागडे असेल आणि त्या सिजनमध्ये मिठाईची मागणी जर का जास्त असल्यास, ते तुमच्याकडून जास्त शुल्क आकारतील.
1. लग्नाच्या तारखेला काय होते ते लक्षात ठेवा
वेगवेगळ्या धर्मात शुभ आणि अशुभ मानले असे दिवस जातात. उदाहरणार्थ, हिंदू धर्मातही वर्षातील काही दिवस अशुभ मानले जातात. अशा वेळी तुम्ही कोणताही धर्म पाळत असलात तरी लग्नाची तारीख ठरवण्यापूर्वी त्या दिवशी काय खास आहे का हे आधीच बघून ठेवा.
2. जर तुम्ही कोर्ट मॅरेज करत असाल तर अशी तारीख निवडा
जेव्हा तुम्ही कार्ट मॅरेज करणार असाल तेव्हा लग्नाची तारीख हुशारीने निवडली पाहिजे. तसेच हंगामी काळात तुम्ही निष्काळजीपणे राहिल्यास तुम्हाला नंतर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कोर्टाच्या तारखाजर व्यस्त असतील तर तुमचे लग्न रजिस्टर होणार नाही.
3. लग्नाच्या ठिकाणानुसार तारीख निवडा
तुमचं लग्न कोणत्या वेळी होणार यावरही लग्नाचं ठिकाण अवलंबून असतं. जर का तुम्ही लग्न पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात करत असाल तर ठिकाणाचे लोकेशन तसेच निवडा. जेणेकरून तुम्हाला कोणत्याही हवामानाचा त्रास होणार नाही. अशातच लग्नाच्या हंगामात एक महिना अगोदर हॉल बुकिंग करू नका. तर सहा महिने किंवा चार महिने लग्नाचा हॉल बुक करून ठेवा. तसेच तुम्हाला हॉल मधल्या काही विशेष गोष्टी हव्या असतील त्यासुद्धा आधीच बुक करा. म्हणजे लग्नाच्या वेळी तुमची घाई होणार नाही याची काळजी घ्या.