घरलाईफस्टाईलतंबाखू सेवनाने वाढतोय हार्ट फेल्युअरचा धोका - भाग २

तंबाखू सेवनाने वाढतोय हार्ट फेल्युअरचा धोका – भाग २

Subscribe

डॉ. शिरिष हिरेमठ

हार्ट फेल्युअर समजून घेताना

हार्ट फेल्युअर किंवा हृदयाचे कार्य मंदावत जाणे हा हळुहळू गंभीर स्वरूप धारण करणारा आजार आहे. यात हृदयाचे स्नायू कमकुवत होत जातात व कालांतराने कडक बनतात. असे झाल्याने त्यांची रक्ताभिसरण करण्याची क्षमता कमी होत जाते. यामुळे शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांपर्यंत ऑक्सिजन आणि पोषक तत्वे पुरेशा प्रमाणात पोहोचू शकत नाहीत.

धूम्रपान आणि हार्ट फेल्युअर

धूम्रपानामुळे धमन्यांच्या अस्तराला इजा पोहोचते व तेथे मेदाचे थर जमा होऊन धमन्या अरुंद होतात. यामुळे त्यांच्यामधून वाहणार्‍या रक्तावरील दाब वाढतो. इतकेच नव्हे तर धुरामध्ये असलेल्या कार्बन मोनॉक्साइडमुळे रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाणही कमी होते. मग शरीरातील ऑक्सिजनची पातळी राखण्यासाठी हृदयाला आपली पम्पिंगची क्रिया करण्यासाठी अधिक जोर लावावा लागतो. सिगारेटच्या धुराबरोबर शरीरात ओढल्या जाणार्‍या निकोटीनमुळे अ‍ॅड्रेनलाइन अधिक प्रमाणात तयार होते व त्यामुळेही हृदय अधिक वेगाने आणि जोरजोरात धडधडू लागते. या सगळ्या कारणांमुळे हार्ट फेल्युअरचा धोका आपोआपच वाढतो.

- Advertisement -

धूम्रपानाच्या बाबतीत लोकांच्या विचारसरणीत मोठा फरक पडला आहे आणि दिवसाला 20-25 सिगारेट्स ओढणारे आता केवळ काही सिगारेट्स ओढतात आणि आपण चांगला बदल केला अशी स्वत:ची समजून करून घेतात. दिवसाला एक- दोन सिगारेट्स प्यायल्याने आपले नुकसान होणार नाही आणि त्यातून कॅन्सरचा धोका उद्भवणार नाही असे त्यांना वाटत असते, तर याचे कारण धूम्रपान करणार्‍यांना कॅन्सरचा धोका दूर ठेवणे हीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वाटत असते, पण अगदी थोडे धूम्रपान केल्यानेही हार्ट फेल्युअरचा धोका मोठ्या प्रमाणात वाढू शकतो या वास्तवाकडे डोळेझाक करून चालणार नाही. धूम्रपान पूर्णतः सोडून देण्याचा पुरस्कार करण्यासाठी हृदयविकार तज्ज्ञांनी जोरकसपणे प्रयत्न करायला हवेत.

धूम्रपान करणारे ज्याप्रमाणे ही सवय पूर्णपणे सोडून देऊन हार्ट फेल्युअरचा धोका कमी करू शकतात, पण तसेच नियमितपणे व्यायाम करणे, शरीराचे वजन निरोगी पातळीवर ठेवणे तसेच रक्तदाब आणि कॉलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवणे या गोष्टी कटाक्षाने पाळत आपल्या हृदयाचे संरक्षण करू शकतात. आपले हृदय शक्य तितके निरोगी आणि सुदृढ रहावे यासाठी डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे वेळच्यावेळी घेणेही महत्त्वाचे आहे. आपल्या वैद्यकीय सल्लागारांनी सांगितलेली उपचारपद्धती कटाक्षाने पाळायला हवी. डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे हार्ट फेल्युअरच्या उपचारामध्ये कळीची भूमिका बजावत असतात. याबरोबरच हृदयाच्या आरोग्यासाठी पुरक अशी जीवनशैली पाळणेही महत्त्वाचे आहे.

- Advertisement -

डॉ. शिरिष हिरेमठ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -