Tuesday, March 25, 2025
HomeमानिनीRecipeब्रेकफास्टसाठी बनवा टेस्टी असा टोमॅटो, ओनियन उत्तपम

ब्रेकफास्टसाठी बनवा टेस्टी असा टोमॅटो, ओनियन उत्तपम

Subscribe

सकाळच्या नाश्ताला दररोज काय बनवावे याचा प्रश्न पडत राहतो. कारण सकाळच्या वेळी नवऱ्याचा किंवा मुलाचा शाळेचा डब्बा असा गोंधळच असतो. अशातच तुम्ही नाश्तासाठी बेस्ट पर्याय म्हणून टेस्टी असा टोमॅटो, ओनियन उत्तपम अगदी 10 मिनिटांत बनवू शकता. चला तर पाहूयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती बद्दल अधिक. (Tomato Onion uttapam recipe)

साहित्य
-अर्धा किलो डोसा पीठ
-1 बारीक चिरलेला कांदा
-1 बारीक चिरलेला टोमॅटो
-1-2 बारीक चिरलेल्या मिर्च्या
-बारीक चिरलेलील कोथिंबीर
-चवीनुसार लाल तिखट
-2-3 टिस्पून तेल

कृती
सर्वात प्रथम तुमच्याकडील नॉन स्टिक तवा घेऊन त्यात 1-2 टिस्पून तेल टाका. गॅस यावेळी मंद आचेवरच ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यावर डोसाचे पीठ टाका आणि ते व्यवस्थितीत गोलाकार पसरुन घ्या. आता त्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, मिर्च्या आणि कोथिंबीर टाका. वरुन लाल तिखट (ऑप्शनल) टाका. असे केल्यानंतर तुम्ही त्यावर पुन्हा तेल थोडं टाकून उत्तपम एका बाजूने शिजू द्या.

खालील बाजूने शिजल्यानंतर तो उलट करा आणि तेथे थोडावेळ शिजू द्या. पुन्हा तो उलट करा आणि गॅस बंद करा. अशा प्रकारे तुमचा ब्रेकफास्टसाठी टेस्टी असा टोमॅटो, ओनियन उत्तपम होईल तयार.


हेही वाचा- Poha Nuggets Recipe: संध्याकाळच्या नाश्तासाठी बनवा टेस्टी ‘पोहा नगेट्स’

Manini