Sunday, February 9, 2025
HomeमानिनीBeauty Tips : टोमॅटो त्वचेसाठी फायदेशीर

Beauty Tips : टोमॅटो त्वचेसाठी फायदेशीर

Subscribe

टोमॅटो हा केवळ आहारासाठीच नव्हे, तर त्वचेसाठीही अत्यंत फायदेशीर घटक आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन C, आणि लाइकोपीन असते. जे त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. टोमॅटोचा नियमित वापर त्वचेला नैसर्गिक चमक देतो, टॅनिंग कमी करतो आणि मुरूम तसेच डाग दूर करण्यास मदत करतो.आज आपण जाणून घेऊयात टोमॅटो त्वचेसाठी किती फायदेशीर आहे.

तेलकट त्वचा नियंत्रित राहते

टोमॅटोमध्ये असलेल्या नैसर्गिक आम्लांमुळे त्वचेवरील जास्त तेल कमी होते. तसेच टोमॅटोचा रस लावून 10-15 मिनिटे ठेवा आणि नंतर धुवा.टोमॅटोचा रस, पेस्ट किंवा मास्कच्या स्वरूपात त्वचेसाठी वापर करता येतो. त्यामुळे तेलकट त्वचा नियंत्रित होते आणि त्वचा तजेलदार आणि टवटवीत राहते.

त्वचा उजळते

टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेचा निस्तेजपणा दूर करतात. त्वचा ग्लोइंग बनवण्यासाठी टोमॅटोचा रस आणि मध एकत्र करून फेस मास्क म्हणून वापरू शकता.

सनटॅन आणि डाग कमी करते

टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म असल्यामुळे टॅनिंग सहजपणे निघून जाते. टोमॅटो एका नैसर्गिक ब्लिचसारखा काम करतो आणि टॅन कमी करतो.सनटॅन कमी करण्यासाठी तुम्ही टोमॅटो आणि दह्याचा पॅक बनवून टॅन झालेल्या भागावर लावा.

मुरुमांवर उपयोगी

टोमॅटोमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे मुरुमांची समस्या कमी करू शकतात.टोमॅटोचा रस चेहऱ्यावर लावून 10 मिनिटांनी धुवा.

त्वचा टवटवीत राहते

त्वचा ग्लोइंग आणि सुंदर बनवण्यासाठी टोमॅटो उत्तम आहे. टोमॅटोमध्ये भरपूर पाणी असते. जे त्वचेच्या हायड्रेशनसाठी उपयुक्त आहे.टोमॅटोचा रस चेहऱ्यावर नियमितपणे लावल्याने त्वचा फ्रेश दिसते.

या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

  • त्वचा संवेदनशील असेल तर टोमॅटो थोडा पाण्यात किंवा गुलाबजलात मिसळून वापरा.
  • टोमॅटो लावल्यानंतर त्वचा थोडी सुकल्यास मॉइश्चरायझर लावा.
  • नियमित वापर केल्यास त्वचा निरोगी आणि उजळ राहते

हेही वाचा : Wart Removal Tips : चामखीळ घालवण्यासाठी घरगुती उपाय


Edited By : Prachi Manjrekar

Manini