Tuesday, April 20, 2021
27 C
Mumbai
घर लाईफस्टाईल कामाच्या तणावामुळे होऊ शकतो हृदय विकार

कामाच्या तणावामुळे होऊ शकतो हृदय विकार

Related Story

- Advertisement -

तुम्ही तुमच्या कामाचं गरजेपेक्षा जास्त टेन्शन घेत असाल तर सावधान! एका संशोधनामधून असे समोर आले आहे की, कामाच्या जास्त ताणामुळे हृदयात धडधडणाऱ्या ठोक्यांवर प्रतिकूल परिणाम होतो. ज्याला ‘अँट्रियल फायब्रिलेशन’ असे संबोधले जाते. ‘युरोपियन जर्नल ऑफ प्रीव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी’ने प्रकाशित केलेलेया अहवालात सांगितले आहे की, जगातील ४८ टक्के लोकांना ‘अँट्रियल फायब्रिलेशन’चा धोका आहे. या धोक्यामुळे मनोभ्रंश आणि हृदयाचे विविध विकार होण्याची शक्यता आहे. धडधडणे, कमकुवतपणा, थकवा, डोळ्यांसमोर अंधार येणे, चक्कर येणे, आणि श्वासोच्छवास घेण्यास अळथळा येणे हे ‘अँट्रियल फायब्रिलेशन’ची लक्षणे आहेत.

कामाचा ताण ‘कोरोनरी’ या हृदय रोगाशी जोडला गेला आहे – तज्ज्ञ
लिओनॉयन फ्रान्सन या संशोधकाने जोंकोपिंग युनिव्हर्सिटी ऑफ स्वीडनमध्ये म्हटले आहे की, कामाचा ताण ‘कोरोनरी’ हृदय रोगाशी जोडला गेला आहे. ‘अँट्रियल फायब्रिलेशन’ आणि ‘कोरोनरी’ रोगाला रोखण्यासाठी योग्य ते उपचार घेणे जरुरी आहे. ज्या लोकांना कामाचा अतिताण होत असेल त्यांनी योग्य वेळी औषधोपचार घेणे गरजेचे आहे. शिवाय हृदय रोगाची लक्षणे लक्षात आल्यास लोकांनी शक्य तेवढा आराम केल्यास उत्तम.

- Advertisement -

१३ हजार २०० लोकांचे संशोधन
स्वीडिश लॉन्गिट्यूडल ऑक्यूपेशनल सर्व्हे ऑफ हेल्थच्या (एसएलओएसएच) तर्फे करण्यात आलेल्या संशोधनात १३ हजार २०० लोकांचा समावेश करण्यात आला होता. त्यासाठी या लोकांना योग्य तो मोबदलाही देण्यात आला. यातील एकाही व्यक्तीला पूर्वी ‘अँट्रियल फायब्रिलेशन’ सारख्या कुठल्याही प्रकारचा हृदय विकाराचा त्रास नव्हता. नोकरीत कामाचे प्रेशर, सततची चिंता, वर्कलोड यामुळे निर्माण झालेल्या तणावातून त्यांना या रोगाला सामोरे जावे लागत आहे, असे संशोधनातून समोर आले आहे.

तणाव कमी करण्यासाठी आपण काय करु शकतो?
रक्तदाब आणि हृदयाचे विकार यांसारख्या विविध आजारांपासून बचाव होण्यासाठी तुम्ही या पाच गोष्टी करु शकता. ज्यामुळे काम आणि आरोग्य यात योग्य तो समतोल साधता येईल.

- Advertisement -

१. व्यायम – शारिरीकदृष्टया फिट असाल तर तणावाचा तीव्रता तितकी जाणवत नाही. त्याचबरोबर व्यायमामुळे आपले शरीराचे वजनही नियंत्रणात ठेवता येते.

२. विश्रांतीने ताण हलका करा – विश्रांती मिळण्यासाठी योग्य उपाय जाणून घेणे फार महत्वाचे आहे. जसे की खोल श्वास घेणे, ध्यान करणे, तालबद्ध व्यायाम आणि योगा या सर्व गोष्टी ताणमूक्त होण्यासाठी उपयुक्त ठरतात.

३. पुरेशी झोप घ्या – झोपेच्या कमतरतेमुळे आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. चिंता आणि उदासीनतेमुळे तीव्र निद्रानाशाचा धोका वाढतो. त्यामुळे पुरेशी झोप घेणे महत्वाचे आहे.

४. काम आणि आयुष्य यात योग्य संतुलन साधा – काम आणि आयुष्य यात योग्य संतुलन साधने गरजेचे आहे. अन्यथा, कामाच्या तणावामुळे आयुष्य जगणंच राहून जाते. त्यामुळे कामाच्या ताणावर योग्य मर्यादा राखणे गरजेचे आहे.

५. मदत घ्या – आपल्याला कामाच्या दडपणातून मानसिक अस्थिरता जाणवल्यास वेळीच डॉक्टरांची मदत घेणे गरजेचे आहे.

- Advertisement -