बऱ्याचदा भाजले की, त्यावर टूथपेस्ट लावण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, भाजल्यावरच नाही तर इतरही गोष्टींकरता टूथपेस्टचा वापर केला जातो.
- लॅपटॉप, मोबाईल किंवा टीव्ही स्क्रिनवरील स्क्रॅच मार्क टूथपेस्ट लावल्याने सहज निघतात.
- चांदीवरील काळपटपणा निघून जाण्यासाठी टूथपेस्टनी पॉलिश करा आणि एका स्वच्छ कापडाने पुसून घ्या.
- भिंतीवरील खडूचे डाग काढण्यासाठी टूथपेस्ट भिंतीवर लावा आणि थोडसे घासून घ्या. यामुळे भिंतीवरील खडूचे डाग निघून जाण्यास मदत होईल.
- बुटाच्या रबरी सोलवरचे डाग घालवण्यासाठी टूथपेस्टचा वापर करा.
- चामड्याच्या जॅकेट किंवा पर्सवरचे डाग काढण्यासाटी टूथपेस्टचा उपयोग करता येतो.
- इस्त्रीची प्लेट खराब झाली असेल तर त्यावर थोडी टूथपेस्ट लावून घासा.
- कार्पेटवर डाग पडले असल्यास टूथपेस्ट आणि ब्रशचा वापर करुन ते साफ करा.
- कांदा आणि लसूण चिरल्यानंतर हाताला येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी टूथपेस्टने हात स्वच्छ करा.