टॉवेल हा असा प्रकार आहे जो आपण आपल्या दैनंदिन दिवसाची सुरुवात ते रात्री झोपेपर्यंत सर्रास वापरतो. अशातच टॉवेल स्वच्छ आणि चांगला असावा अशी प्रत्येकाची उच्च असते. पण होत काय रोज टॉवेल वापरल्यामुळे तो खराब होतो आणि तसेच घाणेरडे टॉवेल आपण असाच वापरतो. यामुळे शरीरावर अनेक जीव जंतू तसेच राहतात आणि टॉवेलने पुसल्यावरही ते कमी होत नाहीत. अशावेळी टॉवेल कसा स्वच्छ ठेवला पाहिजे आणि टॉवेल धुताना कोणती काळजी घ्यायला हवी हे आपल्या माहित असणे हे फार गरजेचे आहे.
काही काही जण टॉवेल खूप दिवस धुवायला टाकत नाहीत आणि मग खूप दिवसांनी ते टॉवेल धुतात. यामुळे घाणेरडे टॉवेल लवकर साफ होत नाही. त्यावरचे डाग,मळ कितीही धुतला तरी कमी होत नाही. म्हणूनच टॉवेल किमान २ ते ३ दिवसांनी धुवावे जेणेकरून ते खराब होणार नाही. अशातच टॉवेल कशाप्रकारे धुवावे आणि टॉवेल धुताना कोणती काळजी घ्यावी तसेच कोणत्या टिप्स वापराव्यात हे आता आपण जाणून घेणार आहोत.
टॉवेल धुतल्या नंतर कडक का होतो ?
जर का तुम्ही टॉवेल धुताना जास्त डिटर्जंट वापरत असाल तर तुमचे टॉवेल सुकल्यानंतर कडक लागू शकत. तसेच डिटर्जंट जर का जास्त झाले तर ते पाण्यातून साफ होऊन लगेच निघत नाही. आणि यामुळे टॉवेल्स कडक तसेच राहतात. टॉवेल्सचे फॅब्रिक जर का जाड असेल तरी सुद्धा टॉवेल धुतल्यानांतर कडक राहू शकत. टॉवेल्सचा रंग जात असेल आणि तुम्ही फॅब्रिक सॉफ्टनर वापरत असाल तर यामुळे देखील टॉवेल्स लगेच धुतल्या धुतल्या कडक होतात.
टॉवेल्स धुताना प्रमाणानुसार डिटर्जंट वापरा
टॉवेल धुताना शक्य तितक्या कमी डिटर्जंटचा वापर करणे नेहमी चांगले. तसेच जर का तुम्ही मशीनमध्ये कपडे लावत असाल तर कपड्यांच्या संख्येनुसारच तेवढ्याच प्रमाणात डिटर्जंट वापरा. काही काही वेळा टॉवेल्समध्ये डिटर्जंट तसेच चिटकून राहते त्यामुळे कमी आणि प्रमाणातच डिटर्जंट वापरावे. कमी डिटर्जंटमूळे कपडे चांगले राहतात. तसेच कपडे कडक देखील होणार नाही.
टॉवेल्स धुताना गरम पाण्याचा वापर करावा
गरम पाण्याने टॉवेल्स धुतल्यामुळे डिटर्जंटचे पार्टिकल्स लवकर त्यामध्ये विरघळतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही वॉशिंग मशिनमध्ये टॉवेल धुत असाल तर आधी गरम पाणी आणि डिटर्जंट हे वॉशरमध्ये चांगले विरघळू द्या, आणि मग त्यानंतर काही मिनिटांनी टॉवेल त्यात टाका. त्यामुळे त्या डिटर्जंटचा चांगला फेस होईल आणि टॉवेल्स चांगल्या प्रकारे धुवून निघतील.
टॉवेल्स धुताना व्हिनेगर वापरा
व्हिनेगरमध्ये टॉवेल्स जरा का तुम्ही धुवायला टाकलात तर टॉवेल्सचे डाग तर पटकन निघतील. तसेच टॉवेल्स मऊ होतील. अशातच महिन्यातून २ ते ३ वेळा व्हिनेगर मधून जर का टॉवेल्स तुम्ही धुवून काढले तर टॉवेल्स खूप दिवस टिकतील आणि स्वच्छ देखील राहतील.
डिटर्जंटमध्ये बेकिंग सोडा टाका
टॉवेल्स धुताना डिटर्जंट पावडरमध्ये बेकिंग सोडा टाकलात तर टॉवेल्सची गुणवत्ता टिकून राहील. तसेच टॉवेल्स स्वच्छ होतील आणि त्यावरचे डाग आणि जीव जंतू देखील साफ होतील. यामुळे शरीराला कोणत्याही प्रकारची ऍलर्जी होणार नाही.