Kitchen Hacks: हिवाळ्यात खा डिंकाचे लाडू; कॅन्सर, हार्टच्या आजारापासून रहा दूर

tragacanth gum benefits gond laddu recipe in winter benefits boosting health
Kitchen Hacks: हिवाळ्यात खा डिंकाचे लाडू; कॅन्सर, हार्टच्या आजारापासून रहा दूर

दिवाळीचा फराळ संपताच बेसन, रवा, बंदु, मोतिचुरच्या लाडूंचे डबे रिकामे होऊ लागतात यावेळी त्यांच्या जागी घरच्या घरी तयार केलेले खमंग, पौष्टिक असे डिंकाचे, मेथीचे किंवा तिळाचे लाडू येऊ बसतात. या दिवसांत थंडीचे प्रमाण वाढत असल्याने अनेक जण डिंकाचे किंवा तिळाचे लाडू खाणे पसंत करतात. परंतु यातील डिंकाचे लाडू तुमच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असल्याचे म्हटले जाते. डिंकाचे लाडू जेवढे खायला रुचकर असतात त्यापेक्षा जास्त पौष्टिक असतात. हिवाळ्यात डिंकाचे लाडू खाल्ल्याने शरीरात उष्णता आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. याशिवाय कॅन्सर, हार्टचा आजार असणाऱ्या रुग्णांसाठी ते अधिक चांगले मानले जातात. यामुळे तुम्ही रोज सकाळी नाश्त्यात किंवा रात्री दुधासोबतही एक लाडू खाऊ शकता. हिवाळ्यात डिंकाचे लाडू खाल्ल्यास संपूर्ण हिवाळ्यात तुम्ही आणि तुमचे कुटुंब निरोगी राहिल. जाणून घ्या घरच्या घरी हे डिंकाचे लाडू कसे बनलू शकता याची रेसिपी.

डिंकाचे लाडू बनण्यासाठी लागणारे साहित्य

१ कप गव्हाचे पीठ
१ किलो गूळ
पाव किलो डिंक
अर्धा किलो सुके खोबरे
अर्धा किलो खारीक
एक वाटी खसखस
१२ -१२ काजूस बदाम
अर्धा वाटी साजूक तूप
५ वेलची पावडर

कसे करायचे डिंक लाडू

– डिंकाचे लाडू करण्यासाठी सगळ्यात आधी डिंकाचे जाडसर तुकडे करुन घ्या. डिंकाची एकदम पेस्ट न करता तो थोडा जाडा- भरडा ठेवा. यासोबत काजू-बदामचेही बारीक तुकडे करा.

– डिंकाला थोडे मंद आचेवरच तूपात भाजून तो थोडावेळ तसाच ठेवावा.

– डिंक जेव्हा फुगते तेव्हा ते चांगले शिजवलेले असते. डिंकाचा भुसा झाला की डिंक शिजला असं समजा.

– यानंतर खोबरे, खसखस भाजून घ्यावे. खोबऱ्याचा किस करून तो थोडासा भाजून घेतला तरी चालते.

– आता कढईत तूप टाका आणि गव्हाचे पीठ हलके तपकिरी होईपर्यंत तळा. पीठ मंद आचेवर तळून घ्या, सुगंध यायला लागल्यावर ताटात काढा.

– यानंतर कढईत गुळ टाकून त्याचा पक्का पाक करून घ्यावा. त्यात अर्धी वाटी तूप घालावे.

– त्यानंतर त्यात आधी डिंक टाकावा. डिंक व्यवस्थित हलवून घेतला की लाडूचे सगळे भाजून तयार असलेले काजू, बिया आणि वेलची पावडर असे सर्व साहित्य त्यात टाकावे.

– आता एका मोठ्या भांड्यात डिंक आणि सर्व गोष्टी एकत्र करा.

– मिश्रण थोडं कामट होत आलं की त्याचे मध्यम आकाराचे गोलाकार लाडू वळावेत.

– हे मिश्रण कोमट असतानाच त्याचे चांगले लाडू वळता येतात. त्यामुळे लाडू वळताना मिश्रण थंड होणार नाही, याची काळजी घ्या.

– हे लाडू तुम्ही पूर्ण २ महिने खाऊ शकता.

-हिवाळ्यात डिंकाचे लाडू खायला खूप चविष्ट असतात, शिवाय ते तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करतात.

नोट: या लेखात नमूद केलेल्या पद्धती फॉलो करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.