Eco friendly bappa Competition
घर लाईफस्टाईल Luxury Train मधून प्रवास करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Luxury Train मधून प्रवास करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

Subscribe

भारतात रेल्वे असे एक साधन आहे ज्याच्या माध्यमातून एका शहरातून दुसऱ्या शहरात अथवा राज्यात जाण्यास फार मदत होते. ट्रेनच्या माध्यमातून प्रवास करणे सुरक्षित आणि स्वस्त ही असते. त्यामुळेच त्याला देशाची लाइफ लाइन मानले जाते. (Travel in luxury train)

भारतीय ट्रेन ज्या प्रकारे देश आणि विदेशात आपल्या वेगासाठी प्रसिद्ध आहे त्याच प्रमाणे  आपल्या उत्तम सुविधांसाठी सुद्धा ओळखली जाते. अशातच देशात अशा काही आलिशान ट्रेन चालवल्या जातात त्याची ही चर्चा परदेशात केली जाते. या आलिशान ट्रेनमध्ये लाखो भारतीय आणि परदेशी पर्यटक सफर करत त्यामधील सुविधांचा लाभ घेत आरामदायी प्रवास करतात.

- Advertisement -

प्रवासासाठी आलिशान ट्रेन योग्य आहे का?
जर तुम्ही आलिशान ट्रेनच्या माध्यमातून प्रवास करण्याचा विचार करत असाल तर सर्वात प्रथम तुम्हाला हे ठरवायचे आहे की, आलिसशान ट्रेनमधून प्रवास करणे योग्य आहे का? जर तुम्ही प्रवासात संस्कृती, आध्यात्मिक, वन्य जीवन, भोजन आणि नैसर्गिक सुंदरेसह वास्तुशिल्पाचे चमत्कार, इतिहास जवळून पहायचा असेल तर आलिशान ट्रेनचा आनंद घेऊ शकता. मात्र आलिशान ट्रेनची तिकिट सामान्य ट्रेनपेक्षा फार अधिक असते. परंतु येथे तुमचा पाहुणचार फार उत्तम केला जातो.

- Advertisement -

तिकिट बुकिंग आणि कॅन्सेलेशनकडे लक्ष द्या
जर तुम्ही आलिशान ट्रेनच्या माध्यमातून प्रवास करण्याचा प्लॅन करत असाल तर तिकिट बुकिंग आणि कॅन्सेलेशनकडे लक्ष द्या. एक सामान्य ट्रेन किंवा सुपरफास्ट ट्रेनच्या तुलनेत आलिशान ट्रेनची तिकिट फार असते. कारण तिकिटासोबत फिरणे, खाण्यापिण्याच्या गोष्टींचा चार्ज ही जोडला जातो. अशातच तुम्ही तिकिट रद्द करत असाल तर अधिक पैसे कापले जाऊ शकतात.

महाराजा एक्सप्रे, डेक्कन ओडिसी आणि स्वर्ण रथ सारख्या आलिशान ट्रेनच्या तिकिटाचे बुकिंग आणि कॅन्सेलेशन चार्जचे नियम वेगवेगळे आहेत.

दररोज चालवल्या जातात का ट्रेन?
खरंतर आलिशान ट्रेन या दररोज धावत नाहीत. काही आलिशान ट्रेन बद्दल असे बोलले जाते की, सीजननुसार त्या चालवल्या जातात. यामधील बहुतांश ट्रेन सप्टेंबर ते जुलै दरम्यान चालवल्या जातात. जसे की, पॅलेस ऑन व्हिल्स केवळ बुधवारी दिल्लीहून राजस्थानच्या काही शहरांमधून जात पुन्हा दिल्लीत येते.


हेही वाचा- ‘या’ धार्मिक ठिकाणी फ्री राहण्याबरोबरच घ्या फिरण्याचा आनंद

- Advertisment -