Tuesday, June 6, 2023
घर मानिनी Health प्रवासात गाडी लागते का? मग करा हे उपाय

प्रवासात गाडी लागते का? मग करा हे उपाय

Subscribe

काही लोकांना फिरण्याची खुप आवडत असते. मात्र प्रवासादरम्यान त्यांना त्रास होतो यालाच मोशन सिकनेस असे म्हटले जाते. अशातच ते दूरवरचा प्रवास करणे टाळतात. मोशन सिकनेसमुळे चक्कर येणे, उलटी होणे किंवा भीती वाटणे अशा काही गोष्टी होतात. असे झाल्यानंतर प्रवास करण्याचा मूड निघून जातो. म्हणून आम्ही तुम्हाला प्रवासादरम्यान गाडी लागत असेल नक्की काय करावे याच बद्दलच्या खास टीप्स सांगणार आहोत.

-स्वत:ला दुसऱ्या गोष्टीत गुंतवा

- Advertisement -


गाडीतून प्रवास करताना तुम्ही रेडिओ ऐकू शकता. अथवा तुमच्या सोबत प्रवास करणाऱ्या व्यक्तींसोबत बातचीत करा. यामुळे तुम्ही डिस्ट्रॅक व्हाल आणि उत्तम ही वाटेल. असे केल्याने उलटी किंवा मळमळणे अशा काही गोष्टी ही होणार नाहीत.

-लाइट फूड

- Advertisement -


कधीकधी खुप जड पदार्थ खाऊन प्रवास करणे त्रासदायक ठरु सकते. कारण असे पदार्थ पचण्यास फार वेळ लागतो. यामुळे तुम्हाला मोशन सिकनेसची समस्या होऊ शकते. नेहमीच प्रवास करताना लाइट फूड खाऊन निघा. अथवा तुमच्या सोबत ही लाइट फूड ठेवा. असे पदार्थ सहज पचतात.

-योग्य सीट


मोशन सिकनेसपासून बचाव करायचा असेल तर तुम्ही गाडीच्या फ्रंट सीटवर बसू शकता.

-पाणी प्या


प्रवासादरम्यान थोड्या-थोड्या वेळाने पाणी पित रहा. यामुळे मोशन सिकनेसच्या समस्येपासून थोडा आराम मिळेल. तसेच तुम्ही हायड्रेट ही रहाल. मात्र कॅफेन युक्त ड्रिंक घेणे टाळा.

-पुस्तक अथवा मोबाईल पाहू नका


बहुतांश लोकांना अशी सवय असते की, प्रवास करताना पुस्तके अथवा मोबाईल पाहू नका. ज्या लोकांना मोशन सिकनेसची समस्या असते त्यांनी असे करणे टाळा. कारण तुमच्या मेंदूवर यामुळे अधिक ताण पडतो.


हेही वाचा- वयाच्या 30 वर्षांनंतर high heels नको रे बाबा !

- Advertisment -

Manini