गेल्या काही वर्षांमध्ये लोकांना त्यांच्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचण्यासाठी गुगल मॅप मदत करत आहे. या उपयोगी टूलमुळे आतापर्यंत न जाणो किती लोक अनोळखी रस्त्यांवरून आपल्या इच्छित स्थळी पोहोचले आहेत. परंतु अनेक वेळेस गुगल मॅप अपडेट नसल्यामुळे त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. प्रवास करणाऱ्या लोकांसाठी गुगल मॅप हे एक प्रसिद्ध नेव्हिगेशन अॅप आहे. या अॅपच्या माध्यमातून जगभरातील अनेक प्रवासी त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचू शकतात. हे अॅप जितके फास्ट आहे तितकेच ते विश्वसनीय देखील आहे. या अॅपमध्ये सेफ्टी फिचरदेखील आहे जे प्रवाशांना केवळ दिशा दाखवण्यास मदत करत नाही तर सुरक्षितरित्या पोहोचवण्यास देखील मदत करतात.
गुगल मॅपचे फायदे
जर तुम्ही तुमच्या कार पार्किंगची जागा सतत विसरत असाल तर तुम्ही गुगल मॅपमध्ये तुमचं पार्किंग लोकेशन सेव्ह करू शकता.
एकाच मार्गातील दोन वेगळी कामं तुम्ही एकाच वेळी करू शकता. जसं की मुलांना शाळेत सोडणे असेल आणि तिथूनच ऑफिसला जायचं असेल तर आधी ऑफिसचं लोकेशन टाकून नंतर मुलांच्या शाळेचे लोकेशन एंटर करा.
ड्रायव्हिंग करता करता वेळोवेळी तुम्ही गुगल मॅपला व्हॉइस कमांडच्या माध्यमातून वापरू शकता.
मॅपमध्ये आपल्या फेव्हरेट प्लेसला लेबल करू शकता. यामुळे तुम्हाला पुन्हा पुन्हा पत्ता टाकण्याची गरज उरणार नाही.
गूगल मॅप डाऊनलोड करून तुम्ही ते ऑफलाइन देखील करू शकता.
गूगल मॅपमध्ये आपल्या लाइव्ह लोकेशनची माहिती तुम्ही फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करू शकता.
ट्रॅव्हल टाइमच्या माध्यमातून तुम्ही जाणून घेऊ शकता की तुम्ही ज्या रस्त्याने जात आहात त्या रस्त्यावर ट्रॅफिक आहे की नाही किंवा त्या रस्त्यामध्ये किती टोल्स आहेत इत्यादी.
या गोष्टींकडे द्या लक्ष:
गूगल मॅपने त्याच्या यूजरचा प्रवास अधिकच सोपा केला आहे. परंतु सुरक्षेच्या दृष्टीने गुगल मॅपचा वापर करत असताना काही सावधगिरी बाळगणे देखील गरजेचे आहे. यासाठीच गुगल मॅपचा वापर करताना काही गोष्टींची नीट काळजी घ्या.
1. गुगल मॅपच्या जुन्या व्हर्जनमध्ये काही त्रुटी असू शकतात, ज्यामुळे वापरकर्ता अडचणीत सापडू शकतो. यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी गुगल मॅप अपडेट करा.
2. वापरकर्ता त्यांच्या स्मार्ट फोनवर गूगल मॅपचे लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड करू शकतो. लेटेस्ट व्हर्जनच्या मदतीने यूझरला सर्व अद्ययावत माहिती आणि नवीन फीचर्स कळू शकतात.
3. वापरकर्त्याने हे कायम लक्षात ठेवायला हवे की पूर्णपणे गुगल मॅपवर कधीच अवलंबून राहू नये.
4. गुगल मॅपचा वापर करत असताना जर तुम्हाला वाटले की तुम्ही चुकीच्या रस्त्यावरून जात आहात किंवा रस्त्यात तुम्हाला चकवा लागला आहे तर अशावेळी स्थानिक लोकांची मदत घ्या. आजूबाजूच्या व्यक्तींना पत्ता विचारा.
5. पुढे कोणतीही रस्त्यात अडथळा असल्यास किंवा रस्ता बंद असल्यास यासंबंधीची कोणतीही माहिती गुगल मॅपमध्ये कधीकधी समाविष्ट केलेली नसते.
6. गूगल मॅपचा वापर करत असताना जर तुम्ही चुकीच्या मार्गावरून जात असाल तर यूजर डायरेक्शन सर्च करण्याआधी अॅपमध्ये स्ट्रीट व्यूचा ऑप्शन सिलेक्ट करा. स्ट्रीट व्यू फीचरच्या माध्यमातून तुम्हाला इच्छित जागेचे फोटो पाहता येतील. तुम्ही झूम करून लहानसहान गल्ल्या आणि बंद रस्ते यांच्याबद्दलही जाणून घेऊ शकता.
7. अनेकदा गुगल मॅप वापरत असताना नदी, सुनसान रस्ता अशा अनेक गोष्टी गुगल मॅप आपल्याला दाखवते. अशा रस्त्यांवर ट्रॅफिक नसणार हा विचार करून अनेकजण हा मार्ग निवडतात. परंतु असे करणे धोकादायक ठरू शकते.
8. प्रवासादरम्यान गुगल मॅप वेळोवेळी वापरकर्त्याला ड्रायव्हिंग अलर्ट देते की कोणत्या ठिकाणी ट्रॅफिक जाम आहे, कोणत्या मार्गांनी तुम्ही जाऊ शकता इत्यादी. या नोटिफिकेशनकडे कधीच दुर्लक्ष करू नका.
9. जर तुम्ही अशा एखाद्या जागी जात असाल जिथे इंटरनेटची सुविधा नाही किंवा लो स्पीड इंटरनेट आहे तर अशा भागाचा मॅप आधीच डाउनलोड करून ठेवा. डाउनलोड केल्यामुळे नेटवर्क नसतानाही हा अॅप तुमची मदत करू शकेल.
10. प्रवासादरम्यान वाईट इंटरनेट कनेक्शन असल्यास मॅपची दिशा पाहण्यात गडबड होऊ शकते. आणि वापरकर्ता अडचणीत सापडू शकतो. यासाठीच प्रवासाला निघण्यापूर्वी वापरकर्त्याने इंटरनेट कनेक्शन वारंवार चेक करायला हवे.
‘स्ट्रीट व्यू’ ऑन करण्यासाठी
गुगल मॅपमध्ये कंपासच्या वर दिलेल्या आयकॉनवर क्लिक करा. ‘स्ट्रीट व्यू’ सिलेक्ट करा.
ज्या इच्छित स्थळी तुम्हाला जायचे आहे तिथले लोकेशन टाका आणि डायरेक्शन ऑन करा.
ड्रायव्हिंग सुरू करण्यापूर्वी गुगल मॅपमध्ये जी दिशा दाखवली जात आहे , त्या दिशेला एका लोकेशनपासून दुसऱ्या लोकेशनपर्यंत झूम करून चेक करा.
असे केल्याने तुम्हाला रस्त्याचा अंदाज येईल आणि यूझर मॅपला फॉलो करत तुम्ही इच्छित स्थळी पोहोचू शकाल.
Edited By – Tanvi Gundaye