सहजसोपा आणि कम्फर्टेबल प्रवास करायचा असेल तर ट्रॅवल लोन घेता येऊ शकते. फार कमी लोकांना हे माहित आहे की ते त्यांच्या प्रवासासाठी ते प्रवास कर्ज अर्थात ट्रॅवल लोन घेऊ शकतात, मग ते त्यांच्या स्वतःच्या देशात असो किंवा परदेशात.
ज्याप्रमाणे तुम्ही गृहकर्ज, कार लोन, एज्युकेशन लोन यांसारखी इतर कर्जे घेता, त्याच प्रकारे प्रवास कर्ज देखील घेतले जाऊ शकते.
ट्रॅव्हल लोनची सर्वात खास गोष्ट म्हणजे ते मिळविण्यासाठी जास्त कागदपत्रे तयार करण्याची आवश्यकता नसते.
त्यासाठी ओळखपत्र, पत्ता आणि रोजगार प्रमाणपत्र यांसारखी किमान कागदपत्रे आवश्यक आहेत.
हे इतके जलद कर्ज आहे की, जर तुम्हाला तात्काळ कर्जाची गरज भासली, तर तुम्ही तातडीच्या प्रवासासाठीही कर्ज मिळवू शकता. काही महत्त्वाची कागदपत्रे देऊन तुमचे कर्ज काही मिनिटांत मंजूर होते. कर्जाचे पैसे एका दिवसात तुमच्या खात्यात देखील हस्तांतरित केले जातात.
प्रवास कर्ज हे वैयक्तिक कर्जासारखे आहे. याद्वारे तुम्ही देशाबरोबरच परदेशातही प्रवास करण्याची तुमची इच्छा पूर्ण करू शकता.
ट्रॅव्हल प्रेमींच्या माहितीसाठी, या प्रवासाशी संबंधित कर्ज केवळ तुमच्या प्रवासाच्या तिकिटाचा खर्चच भागवत नाही तर तुमचा मुक्काम, तुमचे जेवण आणि प्रवासाशी संबंधित खर्च देखील कव्हर केला जातो.तुम्ही तुमचा प्रवास खर्च कोठे खर्च करता यावर कोणतेही निर्बंध नाहीत. या सर्व खर्चासाठी तुम्ही कर्जाचे पैसे देशात आणि परदेशात वापरू शकता.
ट्रॅव्हल लोनसाठी गॅरेंटरची गरज नाही. कर्जाची रक्कम खूप जास्त असल्यास मात्र तुम्हाला गॅरेंटर आवश्यक आहे.
ट्रॅव्हल लोनसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची सिक्युरिटी जमा करण्याची गरज नाही. कारण हे कर्ज अनसिक्युअर्ड लोन आहे.
साधारणपणे, 40 लाखांपर्यंतचे कर्ज 96 महिन्यांपर्यंत परतफेडीच्या पर्यायांसह मिळू शकते. यामध्ये, प्रवास खर्चासह वैयक्तिक कर्जाच्या रकमेबद्दल तपशीलवार स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. येथे हे देखील लक्षात ठेवा की कर्ज क्लियर करण्याची वेळ मर्यादा ही कमीत कमी असायला हवी, जेणेकरून तुमच्या इतर गुंतवणुकीवर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही.
प्रवास सूचना :
ट्रॅव्हल लोन घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखादी विशिष्ट व्यक्ती जेव्हा कर्जाची परतफेड करण्याची क्षमता असेल तेव्हाच कर्ज घेऊ शकते.
तुम्ही कर्जासाठी ऑनलाइन अर्जही करू शकता.
कर्जाचा व्याजदर 10.50 टक्क्यांपासून सुरू होतो.
ट्रॅव्हल लोन घेण्याचा धोका असा आहे की यामुळे तुमच्या सुट्टीतील अनावश्यक खर्चाची शक्यता वाढते. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त खर्च होणार नाही याची काळजी घ्या.
प्रवासाचे बजेट निश्चित करा, जेणेकरून पैशांच्या व्यवस्थापनासोबतच वेळेचे व्यवस्थापनही चांगले करता येईल.
कर्ज मिळण्यास सुलभता आणि जास्त कागदोपत्री काम नसल्यामुळे तुम्ही अनावश्यकपणे कर्ज घेत असाल तर ते टाळा.
खाजगी क्षेत्रातील बँकांकडून 15 लाख रुपयांपर्यंतचे प्रवास कर्ज घेतले जाऊ शकते. यावर किमान 10.25 टक्के व्याज आकारले जाते. या कर्जाची परतफेड करण्यासाठी पाच वर्षांपर्यंतचा कालावधी दिला जातो.
तुम्ही थेट बँकेत जाऊन किंवा ऑनलाइनही अशा प्रकारचे कर्ज घेऊ शकता. अनेक बँका 10.50 टक्के दराने 40 लाख रुपयांपर्यंत कर्जही देतात.
कर्जासाठी ओळखपत्र, पत्ता पुरावा, प्रवास विमा, प्रवासासाठी बुक केलेल्या सर्व तिकिटांची तपशीलवार माहिती द्यावी लागेल.
हेही वाचा : Motherhood : न्यू मॉमसाठी महत्वाच्या टिप्स
Edited By – Tanvi Gundaye