Sunday, February 25, 2024
घरमानिनीFashionकंम्फर्ट-स्टाइलिश लूकसाठी शॉर्ट कुर्तीचे ट्रे्ंन्डी डिझाइन्स

कंम्फर्ट-स्टाइलिश लूकसाठी शॉर्ट कुर्तीचे ट्रे्ंन्डी डिझाइन्स

Subscribe

समर सीजनमध्ये तुम्ही फॅशन ट्रेंन्ड फॉलो करण्याचा विचार करत असाल तर मार्केटमध्ये तुम्हाला विविध ऑप्शन्स मिळतील. या ऑप्शनमधून तुमच्या लूकला मॅच होती असे कपडे तुम्ही खरेदी करु शकता. परंतु कंम्फर्टेबल वाटावे म्हणून असे काही कपडे खरेदी करावेत जे दिसायली जरी सिंम्पल्स असले तरीही घातल्यानंतर तुम्ही त्यात स्टाइलिश दिसाल. यासाठी तुम्ही शॉर्ट कुर्तींच्या पर्याय निवडू शकता. शॉर्ट कुर्ती तुम्ही लेगिंग किंवा जीन्सवर ही वेअर करू शकता. जरी या दोघांवर तुम्हाला वाटते परफेक्ट वाटत नाही तर स्कर्ट हा ऑप्शन तुमच्याकडे आहेच. चला तर पाहूयात असे कोणते ट्रेंन्डी कुर्ते आहेत जे या सीझनमध्ये तुम्ही नक्की ट्राय करु शकता.

कफ्तान शॉर्ट कुर्ती

- Advertisement -


कफ्तान तुम्हाला गाउन, टॉप आणि लॉन्ग कुर्त्यात येतात. परंतु हे डिझाइन शॉर्ट कुर्तीमध्ये घालू शकता. हे दिसण्यास अगदी ट्रेंन्डी असून घातल्यानंतर ही कंम्फर्टेबल वाटतात. तुम्ही कफ्तान शॉर्टी कुर्ती जीन्स, लेगिंग किंवा जेगिंग सोबत घालू शकता. यामध्ये तुम्ही प्लेन, फ्लोरल किंवा हँन्ड वर्क प्रिंट ही घालू शकता.

जियोमॅट्रिक पॅटर्न शॉर्ट कुर्ती

- Advertisement -


जर तुम्हाला मोठे ब्लॉक प्रिंट किंवा झिक-झॅक लाइन पसंद असेल तर तुम्ही जियोमॅट्रिक पॅटर्न शॉर्ट कुर्ती घालू शकता. हा कुर्ता तुम्ही जीन्सवर ही घालू शकता. परंतु उंची लहान असलेल्या महिलांनी असे कपडे घालू नयेत. या डिझाइनमध्ये त्या लहान दिसतात. कुर्त्यात तुम्हाला डिझाइन आणि कलर ऑनलाइन ही मिळतील.

लेअर शॉर्ट कुर्ती


काही वेळेस असे होते की, लेअर असणारे कपडे काही वेळेस कंम्फर्टेबल नसतात. परंतु शॉर्ट कुर्तीच्या या डिझाइनला तुम्ही ट्राय करु शकता.कारण हे डिझाइन फार कमी दिसून येते. त्याचसोबत घातल्यानंतर तुम्ही खुप स्टाइलिश ही दिसता. जर कुर्त्याच्या कापड जॉर्जेट असेल तर याचा लूक अधिक उत्तम होईल. डिझाइनमध्ये तुम्ही टसल, मिरर वर्क किंवा हँन्ड वर्क एम्ब्रॉयडरी असणारा कुर्ता ट्राय करु शकता.

- Advertisment -

Manini