हल्ली मुलींमध्ये नेट आर्टची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मॅचिंग कपड्यांनुसार विविध फंक्शनमध्ये नेट आर्ट केले जाते. काही दिवसात भारत 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. या प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्ही नेट आर्ट करू शकता. तिरंगा स्टाइल नेल आर्ट करुन या दिनी तुम्हाला हटके लूक करता येईल.
नेल आर्ट डिझाइन्स –
तुम्ही नखांवर साध्या तिरंग्याची सजावट करू शकता. यासाठी पांढरा, केशरी किंवा हिरवा रंग वापरता येईल. प्रत्येक नखावर या तीन रंगाचा वापर करुन नेट आर्ट करता येईल.
ही नेट आर्ट तयार करण्यासाठी तुम्हाला नखांवर पांढऱ्या रंगाचा कोट द्यावा लागेल. त्यानंतर केशरी, पांढरा आणि हिरवा रंगाची नेटपेंट लावा. नेटपेंट लावून झाल्यावर टुथपिकच्या साहाय्याने गोलाकार डिझाइन नखांवर तयार करा. ही हटके डिझाइन नखे आकर्षक करण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.
तुम्ही नखांवर छोटा तिरंगा काढू शकता. हे डिझाइन नखांना एक वेगळा आणि आकर्षक लूक देईल.
तिरंगा स्टाइल नेट आर्ट करण्यासाठी तुम्ही ग्लिटर नेलपेंटचा वापर करु शकता. यासाठी तुम्हाला क्रॉस लाइन्सचा वापर करता येईल.
चित्रात दिसत असलेली नेट आर्ट सुद्धा करण्यास सोपी जाते. यासाठी तुम्हाला पांढरा, केशरी, हिरव्या रंगाची नेटपेंट नखांवर लावायची आहे. त्यावर निळ्या रंगाच्या नेटपेंटने अशी फूलांची डिझाइन तुम्हाला काढता येईल.
तुम्हाला पूर्ण नखांवर जर नेट आर्ट करायचे नसेल तर ही डिझाइन परफेक्ट राहील. अर्ध्या नखांवर तुम्हाला अशी कर्व्ह आकारात तीन रंगाच्या नेटपेंटने डिझाइन काढावी लागेल.
याव्यतिरीक्त तुम्ही प्रत्येक नखांवर एका रंगाची नेलपेंट, नखांवर छोटे छोटे डॉट्स घालून तिरंग्याची सजावट करता येईल. ह्या डिझाइन घरीच्या घरी करण्यासाठी अगदी सोपी आहे.
हेही पाहा –