Thursday, September 28, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Relationship खरा बेस्ट फ्रेंड कोण? कसे ओळखाल?

खरा बेस्ट फ्रेंड कोण? कसे ओळखाल?

Subscribe

एखाद्या व्यक्तीला पटकन ओळखणे फार मुश्किल होते. काही वेळेस आपल्याला तो व्यक्ती बाहेरुन छान वाटतो. पण जेव्हा त्याच्यासोबत आपण अधिकवेळा गाठीभेटी करतो तेव्हा तो नक्की कसा आहे हे कळते. पण जेव्हा तो तुमचा मित्र असेल तर ही स्थिती अधिक गंभीर होऊन बसते. काही वेळेस अशा मित्राची आठवण येते ज्याने तुम्हाला फसवलेय. जर तुम्हाला भविष्यात या चुका पुन्हा करायच्या नसतील तर मित्र निवडताना काही गोष्टींकडे लक्ष देणे फार गरजेचे असते. (True Best Friend)

खरा बेस्ट फ्रेंड तोच असतो जो तुम्हाला उत्तम आणि योग्य सल्ला देईल. त्याला तुमच्या सर्व सवयींबद्दल माहिती असले. त्याला हे सुद्धा माहिती असते की, विविध स्थितींमध्ये तुम्ही कसे वागता. अशातच सच्चा मित्र तुम्हाला भडकवण्याऐवजी शांत करण्याचा प्रयत्न करेल. जेव्हा तुमचा मित्र मतलबी असेल तेव्हा तो नेहमीच तुम्हाला लोकांच्या प्रति भडकवण्याचे काम करेल. अशा लोकांपासून तुम्ही दूर राहिलेले बरे.

- Advertisement -

तुमचा मित्र मतलबी असेल किंवा तो अशाच वेळी तुमच्याकडे येईल जेव्हा त्याच्याकडे रिकामा वेळ असेल. पण खरा बेस्ट फ्रेंड तुमच्या प्रत्येक परिस्थितीत तुमच्यासोबत उभा राहिल. तो तुमची गुपित त्याच्यापर्यंतच मर्यादित राहिल. सच्चा मित्र कधीच कोणासोबत तुमच्या गोष्टी शेअर करत नाही. तसेच खरा मित्र तुम्ही जरी त्याच्यापासून दूर गेलात तरीही त्याला वाईट वाटत नाही. तुम्ही त्याच्या सोबत रहाल की नाही किंवा तुम्ही त्याच्यासाठी वेळ काढत नसाल तरीही तो तु्म्हाला काहीही बोलणार नाही. त्याला तुम्हाला भेटण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी एखादी संधी पाहणार नाही. (True Best Friend)

- Advertisement -

जे मित्र तुमच्यासोबत खरी मैत्री करु इच्छितात ते तुम्हाला नेहमीच पाठिंबा देत राहतात. तुम्हाला चांगल्या-वाईटाची ओळख करुन देतो. पण जो मित्र मतलबी असतो तुमच्या बद्दल दुसऱ्यांसमोर वाईटच बोलतो. खरा मित्र तुमच्या आनंदातच त्याचा आनंद मानतो.


हेही वाचा- तुमचे मित्र तुमच्यावर जळतात ‘हे’ कसं ओळखाल

- Advertisment -

Manini