Sunday, March 16, 2025
HomeमानिनीFashion Tips : या ड्रेसवर स्टोन नेकलेस करा ट्राय

Fashion Tips : या ड्रेसवर स्टोन नेकलेस करा ट्राय

Subscribe

ज्वेलरीमुळे तुमचा लूक सुंदर स्टायलिश आणि एलीगंट दिसतो. बऱ्याचदा आपण आपल्या आऊटफिट प्रमाणे ज्वेलरीची निवड करतो. स्टोन नेकलेस हा एक स्टेटमेंट ज्वेलरीचा प्रकार आहे. जो वेगवेगळ्या आउटफिट्सवर उठून दिसतो. योग्य पेअरिंग केल्यास हा तुमच्या लूकमध्ये ग्लॅमर आणि एलिगन्स वाढतो. आज आपण जाणून घेऊयात कोणत्या ड्रेसवर स्टोन नेकलेस ट्राय करू शकतो.

डीप नेकलाइन ड्रेस

मोठे स्टोन नेकलेस हे डीप नेकलाइन असलेल्या गाऊन किंवा ड्रेसेसवर स्टायलिश आणि क्लासी दिसतात. तसेच हे ऑफ-शोल्डर ड्रेसवरही चांगले दिसते.

सिम्पल किंवा प्लेन ड्रेस

सॉलिड कलरचे गाऊन किंवा कुर्ते यावर नेकलेस हायलाइट होतो. प्लेन साडी किंवा अनारकली ड्रेस हे स्टेटमेंट लूकसाठी परफेक्ट आहे. यावर तुम्ही स्टोन नेकलेस घालून मिनिमल मेकअप करून तुमचा लूक क्रिएट करू शकता.

डीप कलर आणि पार्टी वेअर ड्रेस

जर तुमच्याकडे ब्लॅक, डीप रेड, एमराल्ड ग्रीन किंवा नेव्ही ब्लू गाऊन असेल तर यावर हे स्टोन नेकलेस खूप सुंदर आणि आकर्षक दिसतात. हा तुमचा लूक परिपूर्ण आणि सुंदर बनवायला मदत करतात. सिल्क, व्हेलवेट किंवा नेट ड्रेस तुम्हाला रॉयल लूक देईल.

ट्रेडिशनल आउटफिट

बनारसी किंवा कांजीवरम साडीवर मोठ्या स्टोन सेटसोबत परफेक्ट आहे. लेहेंगा किंवा शरारासह तुम्ही सुंदर स्टोन नेकलेस ट्राय करू शकता. तुम्हाला एक ग्रँड लूक मिळेल.

स्टोन नेकलेस निवडताना या गोष्टींची काळजी घ्या

  • ड्रेसच्या नेकलाइन मॅच होईल अशा स्टोन नेकलेसची निवड करा.
  • हाय नेक किंवा टर्टल नेकवर चोकर नेकलेस सुंदर दिसतील.
  • ड्रेसचा रंग नेकलेस मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट निवडा.
  • ड्रेसच्या प्रकाराला मॅच होईल असे नेकलेस निवडा.

हेही वाचा : Beauty Tips : कडुलिंबामुळे केसांच्या या समस्या होतील दूर


Edited By : Prachi Manjrekar

Manini