हिवाळ्यात थंडीपासून बचावासाठी घराच्या घरी ट्राय करा जिंजर – गार्लिक सूप

अशातच थंडीच्या दिवसात विविध प्रकारचे सूप सुद्धा आवडीने प्यायले जातात.

सगळीकडेच आता थंडीमुळे गारवा जाणवू लागला आहे. थंडी पडायला सुरुवात झली की बाहेर पिकनिक ला जाण्याचे प्लॅन तयार होतात त्या सोबतच खवय्येसुद्धा नवीन पदार्थांच्या शोधात असतात. अशातच थंडीच्या दिवसात विविध प्रकारचे सूप सुद्धा आवडीने प्यायले जातात. आणि त्यातही जिंजर गार्लिक सूप असेल तर सर्वच आवडीने त्यावर ताव मारतात. जिंजर – गार्लिक सूपची अशीच एक सोपी रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा. (ginger garlic soup)

जिंजर – गार्लिक सूपसाठी साहित्य

मिक्स भाज्या – 3 कप
आले किसलेले – 1 इंच तुकडा
लसूण पाकळ्या – 4
बारीक चिरलेला कांदा – 1
बारीक चिरलेले गाजर – 1
बारीक चिरलेली शिमला मिरची – 1
स्वीट कॉर्न – 3 टेस्पून
बारीक चिरलेला कोबी – 3 टेस्पून
कॉर्न फ्लोअर स्लरी – 1कप
पातीचा कांदा – 2 टेस्पून
काळी मिरी पावडर – 1 टीस्पून
तेल – 3-4 टीस्पून
मीठ – चवीनुसार

Easy Hot and Sour Soup (Vegetarian, Restaurant Style) – Masalachilli

जिंजर – गार्लिक सूप बनविण्याची कृती

एका भांड्यात मिक्स भाज्या आणि त्यात 5 कप पाणी घेऊन त्यात अर्धा चमचा मीठ माध्यम आचेवर उकळी काढून घ्या. (किमान १५ मिनिटे) मग या सर्व भाज्या एका वेगळ्या भांड्यात काढून घ्या. आता एका कढईत ३ चमचे तेल गरम करून घ्या. तेल गरम झाल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा, लसूण आणि आले घालून परतून घ्या. सर्व साहित्य मऊ होईपर्यंत परतावे. यानंतर स्वीट कॉर्न, अर्धी शिमला मिरची आणि गाजर घालून परतून घ्या. एक मिनिट परतून झाल्यावर त्यात व्हेजिटेबल स्टॉक घाला.(भाज्या शीतनाचे पाणी) ते किमान 5 मिनिटे उकळवा. त्यात कोबी घालून मिक्स करून घ्या. नंतर कॉर्न फ्लोअर स्लरी तयार करा. यासाठी एका भांड्यात 2 टीस्पून कॉर्नफ्लोअर आणि अर्धा कप पाणी घ्या. आता तयार स्लरी सूपमध्ये मिक्स करा आणि 2 मिनिटे उकळवा. सूप घट्ट झाल्यावर त्यात काळी मिरी पावडर, पातीचा कांदा आणि चवीनुसार मीठ घाला. सूप व्यवस्थित ढवळून झाल्यावर आणखी 1 मिनिट अजून उकळी काढून घ्या. तयार आहे तुमचे जिंजर – गार्लिक सूप.


हे ही वाचा – हिवाळ्यात अधिक प्रमाणात आवळा खाल्ल्याने उद्भवतात ‘या’ समस्या