लग्न हा आपल्या आयुष्यातील अत्यंत खास आणि अविस्मरणीय क्षण असतो . या दिवसाची आपण अनेक वर्ष आतुरतेने वाट पाहत असतो. . हा दिवस सुंदर बनवण्यासाठी आपण प्रत्येक गोष्टीची काळजीपूर्वक तयारी करतो. आऊटफिट, ज्वेलरी, मेहंदी अशा सर्व गोष्टींची आपण दक्षता घेतो. परंतु तुमचा संपूर्ण लूक परिपूर्ण बनवण्यासाठी मेकअप देखील खूप महत्वाचा भाग आहे. बऱ्याचदा मुलींना कळत नाही, आपला मेकअप ग्लॅमरस कसा दिसेल. तर आज आपण जाणून घेऊयात, वेडिंगला ग्लॅमरस मेकअप कसा करायचा.
क्लींझिंग आणि मॉइस्चरायझिंग
सर्वात प्रथम चेहरा क्लींझिंग आणि मॉइस्चरायझिंग करू घ्या. यामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहील.
प्रायमर लावा
प्रायमर लावून बेस तयार करू शकता. मेकअप करताना प्रायमर लावणे अत्यंत गरजेचं आहे, याने मेकअप आपल्या त्वचेच्या खोलवर पर्यत जात नाही.
बेस मेकअप
- आपल्या त्वचेच्या टोनला मॅच होणारे फाउंडेशन निवडा
- त्यानंतर ब्लेंडिंग स्पॉंजच्या मदतीने किंवा ब्रशने नीट ब्लेंड करा.
- डार्क सर्कल्स, पिगमेंटेशन किंवा स्पॉट्स कंसीलर लावल्याने कव्हर होते.
- लूज पाउडरच्या मदतीने बेस सेट करून घ्या.
आय मेकअप
- ग्लॅमरस लूकसाठी शिमरी आणि न्यूट्रल शेड्स वापरू शकता.
- ग्लिटर किंवा मेटॅलिक शेड्स अप्लाय करा.
- विंग्स आयलायनरने डोळे अजून सुंदर आणि हायलाइट होतील.
- आय लैशेसचा वापर करताना तुम्ही फॉल्स आय लैशेस लावू शकता.
हायलाइटिंग आणि कॉन्टूरिंग
- चेहऱ्याचे हायलाइटिंग आणि कॉन्टूरिंग करून घ्या.
- तुम्ही सर्वात आधी चेहऱ्याचे हायलाइटिंग आणि कॉन्टूरिंग करून घ्या.
- गाल, नाक इत्यादी भागला चेहरा काॅन्टॉर करून घ्या.
- गालांवर हलका ब्लश लावा.
ओठांचा मेकअप
- ओठांना बॉर्डर करून घ्या.
- तुमच्या ड्रेसशी जुळणारी मॅट किंवा ग्लॉसी लिपस्टिक लावा.
- ग्लॅमरस फिनिशसाठी हलका ग्लॉस अप्लाय करा.
सेटिंग स्प्रे
मेकअप सेट करण्यासाठी सेटिंग स्प्रेचा वापर करा, त्यामुळे मेकअप लॉन्ग-लास्टिंग राहील.हे स्टेप्स फॉलो केल्यास ब्राइडल मेकअप ग्लॅमरस आणि दीर्घकाळ टिकेल.
हेही वाचा : Makeup Tips : अॅट्रेक्टिव्ह लूक देणारा फंकी मेकअप
Edited By : Prachi Manjrekar