ट्राय करा लाल मिरचीचा झणझणीत ठेचा

try red chilli thecha recipe
ट्राय करा लाल मिरचीचा झणझणीत ठेचा

काही लोकांना तिखट पदार्थ अजिबात आवडत नाही. पण काहींना तिखट पदार्थ प्रचंड आवडतात. पाणी पुरी खाताना तिखट पाणी मागून घेणे किंवा वडा पाव खाताना हिरवी मिरची खाणे हे अनेक जणांना खूप आवडते. हिरव्या मिरचीचा ठेचा म्हटलं की तोंडाला पाणी येते. त्यामुळे आज आपण हिरव्या मिरच्याऐवजी लाल मिरचीचा झणझणीत ठेचा कसा करतात हे जाणून घेणार आहोत.

साहित्य 

पाव किलो लाल मिरच्या, एक कुडी लसूण, मीठ, एक चमचा धणे पुड, जिरे पुड, एक मोठा चमचा तेल, एक चमचा लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ

कृती

पहिल्यांदा लाल मिरच्या स्वच्छ धुवून त्याचे देठ काढून एक तास भिजवून ठेवाव्यात. मग मीठ आणि लसूण एकत्र मिक्सरला वाटावे. नंतर एका भांड्यात तेल गरम करून त्यात हे मिश्रण, जिरेपुड, धणेपुड घालून मंद आचेवर ठेवून २ ते ३ मिनिटे परतून घ्यावे. मग शेवटी लिंबाचा रस घालून मिसळून घ्यावे. अशा प्रकारे लाल मिरचीचा ठेचा करावा. हा लाल मिरचीचा ठेचा तुम्ही पोळी, पराठा, पुरी, वरण-भात किंवा इतर कोणत्याही पदार्थांसोबत खाऊ शकता.