Tuesday, June 6, 2023
घर मानिनी चैत्र नवरात्रीच्या उपवासांमध्ये ट्राय करा साबुदाण्याचे अप्पे

चैत्र नवरात्रीच्या उपवासांमध्ये ट्राय करा साबुदाण्याचे अप्पे

Subscribe

नवरात्रीत ध्यान आणि उपासना करण्यासाठी तुमच्या शरीरात ऊर्जा असणे अत्यंत गरजेच आहे. जर तुम्ही उपवासात साबुदाण्याचं सेवन केलं तर तुम्ही दिवसभर उत्साही राहाल शिवाय साबुदाणा आरोग्यासाठी फायदेशीर सुद्धा आहे.

गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या चैत्र नवरात्रीत अनेक जण ९ दिवसांचे उपवास करतात, उपवासात आपण धान्य किंवा पोट भरून अन्न सेवन करत नाही, अशावेळी नवरात्रीत ध्यान आणि उपासना करण्यासाठी तुमच्या शरीरात ऊर्जा असणे अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्ही उपवासात साबुदाण्याचं सेवन केलं तर तुम्ही दिवसभर उत्साही राहाल शिवाय साबुदाणा आरोग्यासाठी फायदेशीरसुद्धा आहे. परंतु उपवासाच्या काळात बरेच जण साबुदाणा खिचडी खाण्यास पसंती देतात, पण कधी कधी साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही साबुदाण्याचे अप्पे बनवून बघा.

साबुदाण्याचे अप्पे बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

 • 1 कप साबुदाणा (भिजवलेला)
 • 2 बटाटे (उकडलेले)
 • 1 चमचा काळी मिरची पाउडर
 • 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून
 • 1 कप शेंगदाणे (भाजलेले)
 • चवीनुसार मीठ
- Advertisement -

कृती :

 • प्रथम भाजलेले शेंगदाणे बारीक वाटून घ्या.
 • त्यात एका भांड्यात साबुदाणा, बटाटा, काळी मिरची पावडर, हिरवी मिरची, शेंगदाण्याचे कुट आणि खडे मीठ टाकून चांगले मिसळा.
 • मिश्रणाचे गोळे तयार करून प्लेटमध्ये ठेवा. प्लेटला झाकण घालण्यास विसरू नका.
 • अप्पे स्टँडमध्ये तेल टाका आणि गरम करण्यासाठी ठेवा.
 • तेल गरम झाले की, गोळे स्टँडमध्ये ठेवा आणि झाकून घ्या. आणि ते ३ ते ४ मिनिट शिजवा.
 • ठरलेल्या वेळेनंतर गोळ्यांना थोडे अधिक तेल लावून दुसऱ्या बाजूनेही ४ मिनिट बेक करा.
 • साबुदाणा अप्पे तयार आहेत.त्यांना नारळ्याच्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.
- Advertisement -

 


हेही वाचा : अशा पद्धतीने बनवा साबुदाणा-सफरचंदाची पौष्टिक खीर

- Advertisment -

Manini