सुंदर दिसण्यासाठी आपण बऱ्याचवेळा वेगवेगळ्या स्टाइलचे कपडे खरेदी करतो. या कपड्यांमुळे आपलं व्यक्तिमत्व चांगले दिसते. योग्य कपड्यांची निवड केल्यामुळे आपण आकर्षक देखील दिसतो. आपला लूक परिपूर्ण बनवण्यासाठी ज्वेलरी देखील महत्वाचा भाग आहे. हल्ली ज्वेलरीमध्ये असंख्य प्रकार आणि डिझाइन्स आपल्याला पाहायला मिळतात. बऱ्याचदा आपण या ज्वेलरीची निवड आपल्याला आऊटफिट किंवा आवडीप्रमाणे करतो.
स्टोन ज्वेलरी दागिन्यांची एक खास शैली आहे. जी वेगवेगळ्या प्रकारच्या खड्यांचा वापर करून तयार केली जाते. स्टोन ज्वेलरी ही प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. हे दागिने प्रामुख्याने खास कार्यक्रमांत महिला परिधान करतात. आज आपण जाणून घेऊयात, कोणत्या स्टोन ज्वेलरी डिझाइन्स आपण ट्राय करू शकतो.
लाॅन्ग नेकलेस सेट
जर तुम्हाला सुंदर आणि एलिगंट लूक क्रिएट करायचा असेल तर तुम्ही, लाॅन्ग नेकलेस सेट ट्राय करू शकता. याप्रकारचे सेट तुम्ही वेस्टर्न आऊटफिटवर देखील घालू शकता. या नेकलेसमुळे तुम्हाला आकर्षक लूक मिळेल. हा सेट तुम्हाला मार्केट किंवा ऑनलाइन दोन्ही ठिकाणी सहजपणे मिळेल.
कस्टमाइज
स्टोन ज्वेलरीमध्ये तुम्हाला अजून एक पर्याय उपलब्ध असतो. तो म्हणजे तुम्ही स्टोन ज्वेलरी कस्टमाइज देखील करू शकता. बऱ्याचदा आपण ज्वेलरीची निवड आपल्या आऊटफिट प्रमाणे करतो. जर ज्वेलरीची स्टोन आपल्या आऊटफिटला मॅच करत नसतील तर तुम्ही या स्टोनमध्ये बदल देखील करू शकता. तुमच्या आऊटफिटला मॅच होईल असे स्टोन यामध्ये अॅड करू शकता.
लेयर स्टोन नेकलेस सेट
जर तुम्हाला काही हैवी ट्राय करायचं असेल तर तुम्ही लेयर स्टोन नेकलेस सेट निश्चितपणे ट्राय करू शकता. हा नेकलेस सेट आपल्याला पारंपरिक आऊटफिटवर खूप सुंदर दिसतो. या सेटमध्ये तुम्हाला काही एक्स्ट्रा स्टोन देखील दिले जातील.
स्टोन चोकर सेट
हल्ली चोकर नेकलेसची खूप फॅशन आहे. हा चोकर सेट तुम्ही साडी किंवा लेहंग्यावर घालू शकता. हा सेट तुम्हाला कुठेही सहजपणे मिळेल. या नेकलेसमुळे तुमचा लूक खूप सुंदर आणि आकर्षक दिसतो.
हेही वाचा : Necklace Designs : गोल नेक ब्लाउज आणि सूटसाठी स्पेशल नेकलेस डिझाई्न्स
Edited By : Prachi Manjrekar