Friday, September 22, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी नवरात्रीत ट्राय करा उपवासाची लुसलुशीत इडली

नवरात्रीत ट्राय करा उपवासाची लुसलुशीत इडली

Subscribe

नवरात्रीत अनेकजण 9 दिवसांचा उपवास करतात. या काळात शरीर मजबूत ठेवण्यासाठी पौष्टिक आहार घेणं गरजेच आहे. आत्तापर्यंत तुम्ही उपवासाचे अनेक नवनवीन पदार्थ ट्राय केले असतील. मात्र, आज आम्ही तुम्हाला उपवासाची इडली कशी बनवायची हे सांगणार आहोत.

साहित्य :

  • 100 ग्रॅम साबुदाणा
  • 100 ग्रॅम दही
  • 150 ग्रॅम वरीचे तांदूळ
  • बेकिंग सोडा
  • मीठ चवीनुसार
  • 1/2 चमचा जिरं
- Advertisement -

कृती :

  • सर्वप्रथम साबुदाणा आणि वरी मिक्सरमध्ये वेगवेगळे वाटून घ्या.
  • आता हे मिश्रण एकत्र करून त्यामध्ये दही, जिरे आणि चवीनुसार मीठ, गरजेनुसार पाणी टाकून भिजवा.
  • आता हे मिश्रण 1-2 तास झाकून ठेवा.
  • ठरावीक वेळेनंतर तयार मिश्रणात 1/4 चमचा बेकिंग सोडा घालून मिश्रण नीट एकजीव करा.
  • आता इडलीच्या भांड्यातील इडलीप्लेटला तेल लावा आणि त्यात ते मिश्रण भरा.
  • आता नेहमीप्रमाणे इडलीपात्रातील इडल्या वाफवून घ्या.
  • तुमची उपवासाची इडली नारळाच्या चटणीसोबत सर्व्ह करा.

 


- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -

Manini