वाढत्या प्रदूषणामुळे किंवा घराची साफसफाई करताना बऱ्याच लोकांना धूळीची ॲलर्जी होते. आता ही समस्या खूप सामान्य झाली आहे. समस्या जरी सामान्य असली तरी त्याचा गंभीर परिणाम आपल्या शरीरावर होतो, या धुळीमुळे आपल्याला शिंका येतात, नाक गळणे , डोकेदुखी आणि श्वास घेण्यात अडचणी निर्माण होतात. ज्या लोकांना दमा आहे त्यांना मोठ्या प्रमाणात याचा त्रास होतो वारंवार शिंका येणे खोकला येणे परंतु काही घरगुती उपायांनी तुमचा हा त्रास दूर होऊ शकतो. आज आपण जाणून घेऊयात, धुळीच्या ॲलर्जीवर कोणते घरगुती उपाय आपण करू शकतो.
धूळीमुळे किंवा प्रदूषणामुळे होणाऱ्या ॲलर्जीवर हे घरगुती उपाय करा
सायडर व्हिनेगर
धूळ आणि अॅलर्जीचा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही सायडर व्हिनेगर वापरू शकता.
तुळशीचे पाणी
जर तुम्हाला वारंवार धुळीची ॲलर्जी होत असेल तर तुम्ही तुळशीच्या पानांचे अर्क किंवा पाणी दिवसातून दोनदा प्यायल्याने प्रतिकारशक्ती वाढते आणि धुळीची ॲलर्जी होत नाही
हळद आणि मध
एका ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मध घालून प्यायल्याने सूज कमी होण्यास आणि श्वसनतंत्र सुधारण्यास मदत होते.
वाफ घेणे
वाफ घेतल्याने नाकातील धूळकण आणि सर्दी दूर होण्यास मदत होते.
आवळा
आवळा हा आपल्या आरोग्यासाठी खूप गुणकारी असतो. नियमित खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. आवळ्याचा रस पिणे किंवा कच्चा आवळा खाणे आपल्या आरोग्यासाठी लाभदायक असते.
लिंबू पाणी
लिंबू पाण्यात व्हिटॅमिन सी भरपूर असते. हे श्वसनाच्या समस्या दूर करण्यास उपयुक्त आहे.
कोमट पाणी
रोज सकाळी कोमट पाणी पिण्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि धुळीच्या ॲलर्जीचे प्रमाण कमी होते.
घर नियमित स्वच्छ ठेवणे
घर नियमित स्वच्छ ठेवल्यामुळे घरात धूळ होत नाही. घर धूळमुक्त होते.
या सर्व घरगुती उपायांनी तुम्हाला धुळीची ॲलर्जी होणार नाही. जर तुम्हाला जास्त त्रास होत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.
हेही वाचा : Health Tips : फ्रोझन फूड आरोग्यासाठी हानिकारक
Edited By : Prachi Manjrekar