Monday, January 6, 2025
HomeमानिनीBeauty Tips : हिवाळ्यात पिंपल्स येऊ नये म्हणून हे घरगुती उपाय करा

Beauty Tips : हिवाळ्यात पिंपल्स येऊ नये म्हणून हे घरगुती उपाय करा

Subscribe

हिवाळ्यात वातावरण थंड असल्यामुळे आपली त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसू लागते. या दिवसात आपल्याला त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. काळजी घेतली नाही चेहरा खराब होतो. चेहऱ्यावर मुरम येऊ लागतात. हिवाळ्यात पिंपल्स येण्याची समस्या खूप सामान्य आहे. परंतु या समस्येकडे दुर्लक्ष केल्याने समस्या अजून वाढते. अशावेळी जर आपण केमिकल प्रॉडक्ट्स वापरले तर चेहऱ्यावर अजून पिंपल्स येऊ लागतात. त्यामुळे तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता.

चेहरा मॉइश्चरायझ करा

चेहरा हायड्रेट राहणे अत्यंत गरजेचं असते तुम्ही तुमच्या त्वचेप्रमाणे मॉइश्चरायझर लावू शकता. या मॉइश्चरायझरमुळे तुमचा चेहरा हायड्रेट आणि चांगला राहील.

- Advertisement -

फेसपॅक लावा

हळद, मध, बेसन, मुलतानी माती, लिंबाचा रस, गुलाबपाणी, ओट्स, टी ट्री ऑइल, कोरफड आणि पपई यांसारख्या नैसर्गिक घटकांचा वापर करून तुम्ही फेसपॅक बनवू शकता.

गरम पाण्याने चेहरा धुणे टाळा

कोमट किंवा थंड पाण्याने चेहरा धुवा.गरम पाण्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स देखील येणार नाही.

- Advertisement -

तूप किंवा नारळाचे तेल लावणे

झोपण्यापूर्वी तूप किंवा शुद्ध नारळाचे तेल लावल्याने त्वचेतील ओलावा टिकून राहतो.

बेसन आणि हळदीचा लेप

बेसन हळद आणि दूध एकत्र करून पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटांनी धुवा. यामुळे त्वचा स्वच्छ आणि तजेलदार होईल.

मध आणि दालचिनीचा लेप

मध आणि थोडी दालचिनी पावडर एकत्र करून चेहऱ्यावर 10-15 मिनिटे ठेवा. हा लेप जंतुसंसर्ग कमी करून पिंपल्स कमी करतो.

टी ट्री ऑइल वापरा

पिंपल्सवर थोडे टी ट्री ऑइल लावा. हे तेल अँटी-बॅक्टेरियल असल्याने पिंपल्स लवकर बरे होतात.

केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स टाळा

जास्त केमिकलयुक्त फेस वॉश किंवा स्किन प्रॉडक्ट्स वापरू नका.

या घरगुती उपायांनी तुम्हाला हिवाळ्यात पिंपल्स येणार नाही.

हेही वाचा : Health Tips : दिवसभर एनर्जेटिक राहण्यासाठी लावा या सवयी


Edited By : Prachi Manjrekar

 

- Advertisment -

Manini