आपला लूक परिपूर्ण आणि सुंदर बनवण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो. बऱ्याचदा आपण आऊटफिट आणि ज्वेलरीचा विचार करतो परंतु तुम्हाला माहिती आहे का ? तुमचा लूक आकर्षक आणि सुंदर बनवण्यासाठी लिपस्टिक देखील अत्यंत महत्वाचा भाग आहे. लिपस्टिकमुळे आपल्या संपूर्ण लूकची शोभा वाढते. काहीवेळा आपण चुकीची लिपस्टिक लावतो. त्यामुळे आपला संपूर्ण लूक खराब होतो. त्यामुळे आज आपण जाणून घेऊयात, परफेक्ट लूकसाठी आपण कोणती लिपस्टिक लावू शकतो.
डेली वेअरसाठी
तुम्ही डेली वेअरसाठी न्यूड शेड्सची लिपस्टिक किंवा पीच शेड्सची लिपस्टिक ट्राय करू शकता. कॅज्युअल लूकसाठी उत्तम आहे.
मॅट लिपस्टिक
जर तुम्ही कुठे लांब जात असाल तर ही मॅट लिपस्टिक दीर्घकाळ राहील. तुमचा लूक देखील खराब होणार नाही.
सॉफ्ट मॅट लिपस्टिक
सॉफ्ट मॅट लिपस्टिक ही दीर्घकाळ टिकते आणि नॅचरल लूकसाठी बेस्ट आहे.
पार्टी वेअरसाठी
पार्टी वेअरसाठी रेड वाईन किंवा प्लम शेड्स लिपस्टिक उत्तम आहे.
ग्लॉसी फिनिश
ग्लॉसी फिनिशसाठी गुलाबी किंवा कोरल रंगात ग्लॉसी लिपस्टिक तुम्ही वापरू शकता.
विन्टर लूकसाठी
हिवाळ्यात जाड कपड्यांसोबत डार्क बर्गंडी आणि डीप ब्राउन लिपस्टिक तुम्ही लावू शकता.
अशा प्रकारे तुम्ही परफेक्ट लूकसाठी या लिपस्टिक ट्राय करू शकता.
लिपस्टिक लावण्याची टिप्स:
- ओठांच्या मध्यभागी लिपस्टिक लावा
- लिपस्टिक लावताना आधी बाहेरून बॉर्डर करून घ्या.
- जेणेकरून ती बाहेर पसरणार नाही.
- तुम्ही व्हर्च्युअल ट्राय-ऑन टूलचाच्या मदतीने तुमच्यावर कोणती लिपस्टिक सुंदर दिसेल हे पाहून ती घेऊ शकता.
हेही वाचा : Hair Care Tips : बदलत्या ऋतूमुळे होणारा हेअर फॉल या उपायांनी कमी करा
Edited By : Prachi Manjrekar