महाशिवरात्रीचा पवित्र सण आला की पारंपरिक वेशभूषेला विशेष महत्त्व मिळतं.महाशिवरात्रीला हिरवे, पिवळे आणि लाल रंगाचे कपडे घालण्याला खूप महत्त्व दिले जाते. जर तुमचं नवीन लग्न झालं असेल आणि तुम्हाला या शुभ सणाच्या निमित्ताने सुंदर ग्लॅमरस आणि ग्रेसफुल लूक पाहिजे असेल तर तुम्ही बॉलिवूड आणि मराठी अभिनेत्रींच्या स्टाइलमधून प्रेरणा घेऊन तुमचा लूक क्रिएट करू शकता. आज आपण जाणून घेऊयात महाशिवरात्रीला अभिनेत्रींच्या कोणत्या रेड साड्या ट्राय करू शकतो.
कंगना राणौत
तुम्ही कंगना राणौतचा हा साडी लूक ट्राय करू शकता . हा लूक अतिशय क्लासी आणि चांगला दिसेल. तसेच या अभिनेत्रीप्रमाणे तुम्ही हैवी लूक, बन हेअरस्टाईल आणि मिनिमल मेकअप करू शकता.
रुपाली गांगुली
रुपाली गांगुलीने यामध्ये भारी जॉर्जेट साडी नेसली आहे साडी आणि ब्लाउजच्या बॉर्डरवर जड भरतकाम आहे. महाशिवरात्रीला साध्या आणि सोबर लूकसाठी तुम्ही रुपाली गांगुलीचा लूक क्रिएट करू शकता.
सोनारिका भदौरिया
सोनारिका भदौरियाने लाल रंगाची बनारसी साडी नेसली आहे. तिने या साडीवर जड दागिने परिधान केले आहे. तुम्ही महाशिवरात्रीला सोनारिका भदौरिया सारखा लूक करू शकता. हातात लाल रंगाच्या बांगड्या घालून लूक पूर्ण करू शकता.
समांथा
समांथा रूथ प्रभूने मिनिमल मेकअप आणि बनारसी साडी नेसून तिचा लूक क्रिएट केला आहे. जर तुम्हाला सिम्पल आणि सोबर लूक करायचा असेल तर तुम्ही समांथाचा हा लूक क्रिएट करू शकता.
तमन्ना भाटिया
साडीत स्टायलिश आणि सुंदर लूक मिळवण्यासाठी, तुम्ही तमन्ना भाटियाचा लूक क्रिएट करू शकता. तिने यामध्ये फ्लोरल प्रिंट साडी नेसली आहे. हल्ली या प्रिंटेड साड्या आणि सूट खूप ट्रेंडमध्ये आहेत. महाशिवरात्रीसाठी तुम्ही अभिनेत्रीचे हे लूक ट्राय करू शकता.
मराठमोळा लूक
जर यंदाच्या महाशिवरात्रीला तुम्हाला मराठमोळा लूक ट्राय करायचा असेल तर तुम्ही या मराठी अभिनेत्रीचा लूक रिक्रीएट करू शकता.
हेही वाचा : Fashion Tips : फेअरवेल पार्टीसाठी स्टायलिश साड्या
Edited By : Prachi Manjrekar