महिलांना मेकअप करण्याची खूप आवड असते. प्रत्येकीच्या मेकअप बॉक्समध्ये मेकअपचे अनेक प्रोडक्ट्स असतात. यातीलच एक मेकअप प्रोडक्ट म्हणजे मस्कारा. जो डोळ्यांचे सौंदर्य वाढवतो. आज आम्ही तुम्हाला मस्कारा वापरताना काय काळजी घ्यावी याबाबत काही टीप्स सांगणार आहोत.
मस्कारा वापरताना महत्वाच्या टीप्स
- Advertisement -
- ट्यूबमधून ब्रश काढताना जास्तीचा मस्कारा काढून टाकावा जेणेकरून पापणीचे केस एकमेकांना चिकटणार नाहीत.
- मस्कारा ब्रशची कांडी सतत ट्यूबच्या आत बाहेर करू नका. त्यामुळे ट्यूबमध्ये हवा जाते आणि मस्कारा लवकर कोरडा होतो. थोड्याच दिवसांत त्याचे पातळ तुकड्यांमध्ये रूपांतर होते. त्यासाठी हळूवार ब्रशची कांडी मागे-पुढे व गोलाकार फिरवून पाहिजे तेवढा मस्कारा ब्रशवर घ्यावा.
- मस्कारा लावण्याची सुरुवात खालच्या किंवा वरच्या पापणीपासून केलीत तरी चालेल. पण जर खालच्या पापणीपासून केलीत तर वरच्या पापणीवर येणारे डॉट्स टाळू शकता. कारण खालच्या पापणीला मस्कारा लावण्यासाठी खाली बघितले की वरच्या पापणीचे केस खाली भिडतात.
- Advertisement -
- वरच्या पापणीला मस्कारा लावताना सरळ बघावे. ब्रश पापणीच्या मुळावर ठेवावा व वरच्या दिशेने गोलाकार फिरवावा. त्यामुळे पापण्या कुरळ्या होतील. हीच क्रिया तोपर्यंत करत राहा जोपर्यंत हव्या तशा पापण्या जाड दिसत नाहीत. साधारण 2-3 कोट्स द्यावेत.
- जेव्हा खालच्या पापणीला मस्कारा लावाल तेव्हा मान थोडी पुढे करून लावा जेणेकरून गालांना मस्कारा लागणार नाही.
- मस्कारा जर पापण्यांच्या मुळापासून लावला नाही तर त्या आहेत त्यापेक्षा लहान दिसतात.
हेही वाचा :