Friday, January 24, 2025
HomeमानिनीFashion Tips : मकरसंक्रातीला ट्राय करा या हटके साड्या

Fashion Tips : मकरसंक्रातीला ट्राय करा या हटके साड्या

Subscribe

मकरसंक्रांती हा सण फक्त धार्मिक नसून, सांस्कृतिकदृष्ट्याही खूप महत्त्वाचा मानला जातो. हा सण वसंत ऋतूत येत असल्यामुळे रंगीबेरंगी कपडे आणि पारंपरिक पोशाखांना अधिक महत्त्व दिले जाते. मकरसंक्रांतीसाठी तुम्ही खास फुलांच्या रंगछटांचे, सिल्क, कांजीवरम, किंवा सुंदर साड्यांचा लूक करू शकता. आज आपण जाणून घेऊयात, मकरसंक्रातीला अभिनेत्रींच्या कोणत्या साड्या आपण ट्राय करू शकतो.

पिवळा रंग

तुम्ही मकर संक्रातीला सुंदर पिवळी साडी देखील नेसू शकता. बऱ्याचदा आपण यादिवशी काळ्या रंगाची साडी नसतो परंतु जर तुम्हाला यावर्षी हटके लूक करायचा असेल तर तुम्ही पिवळी साडी देखील नेसू शकता. तुम्ही पूजा हेगडेसारखी पिवळ्या रंगाची हलकी फॅब्रिकची साडी कॅरी करू शकता. या प्रकारची साडी तुम्ही सहजपणे कॅरी करू शकता.

हिरवा रंग

हिरवा रंग हा निसर्गाशी निगडित असतो. त्यामुळे तुम्ही मकरसंक्रांतीला ही खास साडी नेसू शकता . अभिनेत्री कियारा अडवाणीप्रमाणे हलक्या हिरव्या रंगाची साडी तुम्ही नेसू शकता. तिचा हा लूक रिक्रेट करू शकता.

गुलाबी रंग

गुलाबी रंग हा प्रत्येक महिलेच्या हृदयात असतो. हा रंग प्रत्येक महिलेवर खूप खुलून दिसतो. हा गुलाबी रंग तुम्ही कोणत्याही खास कार्यक्रमात घालू शकता. जान्हवी किंवा कियाराप्रमाणे स्टाइल करू शकता.

ऑरेंज

नवविवाहित मुलींनी मकर संक्रांतीसाठी पूजा हेगडेसारखी ऑरेंज साडी कॅरी करू शकता. ही साडी तरुण मुलींवर खूप सुंदर आणि आकर्षक दिसते.

लाल रंग

मकर संक्रांतीला लाल रंगाची साडी नेसल्यानेतुम्हाला चांगला लूक मिळेल. नववधू त्यांच्या पहिल्या संक्रांतीसाठी दिव्यांका त्रिपाठीच्या कर्व्ह बॉर्डर असलेली साडी स्टाइल करू शकता.

मकरसंक्रातीला या सुंदर साड्या तुम्ही ट्राय करू शकता.

हेही वाचा : Winter Fashion Tips : हिवाळ्यातही मिळेल स्टेटमेंट लूक या अॅक्सेसरीजने


Edited By : Prachi Manjrekar

Manini