बऱ्याच तरुणींना फॅशनमध्ये एक्सपेरिमेंन्ट करायला खूप आवडते. हल्ली सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला विविध ट्रेंड आणि फॅशन बद्दल माहिती मिळते. आपण त्या ट्रेंडनुसार आपलं वॉर्डरोब अपडेट करतो. जेणेकरून तुम्हाला खास प्रसांगी एक वेगळा लूक मिळेल. बऱ्याचदा आपण कोणत्याही कार्यक्रमात साडी किंवा सलवार सूट स्टाइल करतो परंतु तुम्हाला काही हटके आणि स्टायलिश लूक पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्ट्रास्ट सलवार सूट ट्राय करू शकता. आज आपण जाणून घेऊयात कोणता कॉन्ट्रास्ट सलवार सूट ट्राय करू शकतो.
सिल्क पेंट सूट
तुम्ही साउथची अभिनेत्री कीर्ती सुरेश सारखा हिरवा आणि पिवळा रंगाचा कॉन्ट्रास्ट सूट घालू शकता. या अभिनेत्रीच्या सिल्क फॅब्रिकच्या पँट सूटवर धाग्याचे काम करण्यात आले आहे. या कुर्त्याची नेकलाइन व्ही-आकाराची आहे. दुपट्टा आणि पायजम्याच्या काठावर सोनेरी लेस आहे. या ड्रेससह तुम्ही हिल्स घालू शकता.
आलिया भट्ट
तुम्ही आलिया भट्टचा हा ग्रीन आणि ऑरेंज ड्रेस घालू शकता. हा ड्रेस कॉलेज किंवा ऑफिसच्या खास कार्यक्रमासाठी उत्तम आहे. हा ड्रेस तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही ठिकाणी सहजपणे मिळेल.
पिवळा ड्रेस
जर तुम्हाला हळदीला किंवा कोणत्याही खास प्रसंगी काही सिम्पल आणि सोबर असं काही स्टाइल करायचं असेल तर तुम्ही हा कॉन्ट्रास्ट सलवार सूट ट्राय करू शकता. हा ड्रेस खूप एलिग्नंट आणि सुंदर दिसेल.
हे ड्रेस कसे स्टाइल करावे
- पेस्टल कुर्त्यासोबत गडद रंगाचा सलवार आणि दुपट्टा स्टाइल केल्याने तुम्हाला एलिगंट लूक मिळेल.
- ट्रेडिशनल आणि स्टायलिश लूकसाठी प्रिंटेड कुर्त्यासोबत सॉलिड रंग परफेक्ट आहे
- मॉडर्न आणि काही फ्यूजन स्टाइल करत असाल तर शॉर्ट कुर्ता पॅलाझो किंवा धोती पॅन्ट उत्तम आहे.
कॉन्ट्रास्टमध्ये कोणते रंग चांगले दिसतात?
- तुम्ही नेव्ही ब्लूसह पीच कलर ट्राय करू शकता.
- जर तुम्हाला मस्टर्ड कलर आवडत असेल तर तुम्ही वाईन रेड कॉन्ट्रास्ट करू शकता.
- ब्लॅक आणि मरूनचे कॉम्बिनेशन देखील हटके वाटेल.
हेही वाचा : Winter Fashion Tips : या विंटर सीझनमध्ये साडीसोबत स्टाईल करा जॅकेट
Edited By : Prachi Manjrekar