हिवाळ्यात वातावरणातील आर्द्रतेमुळे आपल्या त्वचेसह केसांच्या देखील अनेक समस्या निर्माण होतात. केस कोरडे आणि तुटू लागतात. आजकाल, कोरडे आणि निर्जीव केस ही एक सामान्य समस्या आहे. या ऋतूमध्ये थंड वाऱ्यामुळे केसांचे पोषण कमी होऊ लागते त्यामुळे टाळूपासून केस कोरडी होऊ लागतात. या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास समस्या अजून वाढू शकते. त्यामुळे केसांची योग्यवेळी निगा राखणे गरजेचे आहे. अशाने आपले केस खराब देखील होणार नाही. आज आपण जाणून घेऊयात, हिवाळ्यात कोणता होममेड हेअर मास्क आपण वापरू शकतो.
दूध आणि मध हेअर मास्क
सामग्री
- कच्चे दूध 1 वाटी
- मध 1 टीस्पून
बनवायची पद्धत
- सर्वात प्रथम एका वाटीमध्ये कच्चे दूध आणि मध घालून मिश्रण चांगले मिक्स करून घ्या.
- या मास्कला हाताच्या मदतीने आपल्या स्कैल्पवर देखील लावा.
- हा मास्क 15 ते 20 मिनिटे केसांवर लावा.
- हा मास्क सुकल्यावर शॅम्पूने केस स्वच्छ धुवा.
- या मास्कला तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा लावू शकता.
अळशी एलोवेरा आणि अंडी हेअर मास्क
साहित्य
- अंडी 1
- अळशी अर्धा कप
- कोरफड 2 चमचे
बनवायची पद्धत
- या हेअर मास्कला बनवण्यासाठी एका वाटीमध्ये अंडी फोडून त्यात कोरफड घालून मिक्स करा.
- आता अळशीच्या बिया पाण्यात घालून भिजवा.
- काही वेळ भिजवल्यानंतर यातलं पाणी गाळून घ्या.
- नंतर अंडी आणि कोरफडीच्या मिश्रणात मिक्स करा.
- या सर्व मिश्रणाला चांगलं फेटून घ्या.
- अशा प्रकारे तुमचा हेअर मास्क तयार आहे.
- हा हेअर मास्क कमीतकमी अर्धा तास केसांवर लावून ठेवा.
- हेअर मास्क पूर्णपणे सुकल्यानंतर, शैम्पूने धुवा.
अशा प्रकारे तुम्ही हिवाळ्यात हे घरगुती हेअर मास्क बनवून केसांना लावू शकता.आपल्या केसांची निगा राखू शकता. याने तुमचे केस कोरडे आणि गळणार देखील नाही. केस मजबूत राहतील.
हेही वाचा : Split Ends hair : दुतोंडी केसांपासून सुटका मिळवा या उपायांनी
Edited By : Prachi Manjrekar