पनीर हा असा प्रकार आहे जे सर्वांना आवडतो. तसेच त्यापासून तयार करण्यात येणाऱ्या विविध रेसिपी देखील अनेकांना आवडतात. त्यातीलच एक रेसिपी म्हणजे ‘पनीर कबाब’.
साहित्य :
- 1 किलो पनीर
- 20 ग्रॅम बटर
- 15 ग्रॅम कॉर्नफ्लोर
- 25 ग्रॅम अद्रक पेस्ट
- 6 बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या
- मोठा चमचा लिंबूचा रस
- 150 ग्रॅम बारीक कापलेला कांदा
- मीठ
- मीरपूड
कृती :
- Advertisement -
- सर्वप्रथम पनीरचे बारीक चौकोनी तुकडे करा.
- बटर वगळता वरील सर्व साहित्य मिक्स करुन घ्यावे.
- त्यानंतर हे मिश्रण समान भागांमध्ये वाटून घ्यावे.
- आता ओव्हन 150-75 डिग्री सेंटी ग्रेटवर गरम करा.
- त्यानंतर स्टिकवर बटर लावा आणि प्रत्येक स्किटवर ते मिश्रण चांगल्या प्रकारे कबाब प्रमाणे लावून घ्या.
- त्यावरुन बटर लावून चांगल्या प्रकारे भाजून घ्या.
- तुमचे स्वादिष्ट कबाब तयार. हे कबाब पुदीन्याच्या चटनीसोबत सर्व्ह करु शकता.
हेही वाचा :