महाशिवरात्रीला अनेकजण उपवास करतात. या काळात शरीर मजबूत ठेवण्यासाठी पौष्टिक आहार घेणं देखील गरजेच आहे. आत्तापर्यंत तुम्ही उपवासाचे अनेक नवनवीन पदार्थ ट्राय केले असतील, मात्र आज आम्ही तुम्हाला उपवासाची चटपटीत मिसळ कशी बनवायची हे सांगणार आहोत.
साहित्य :
- तयार साबुदाण्याची खिचडी
- दही
- 3-4 मिरच्या
- खारे शेंगदाणे
- बटाट्याची शेव
- केळीचे वेर्फस
- मीठ चवीनुसार
- डाळिंबाचे दाणे
- Advertisement -
कृती :
- सर्वप्रथम खारे शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या पाणी घालून मिक्सरमध्ये वाटून घ्या.
- आता कढईत तेल घालून त्यात जिरं, मिरची आणि शेंगदाण्याचे वाटण, मीठ घाला.
- आता त्यात थोडं पाणी टाकून तयार आमटी उकळून घ्या.
- आता दुसरीकडे एका भांड्यात साबुदाण्याची तयार खिचडी, त्यावर बटाट्याची शेव, केळीचे वेफर्सचा चुरा, एक चमचा दही, शेंगदाणे, डाळिंबाचे दाणे घाला.
- आता त्यावर तयार केलेली आमटी घाला आणि सर्व्ह करा.
हेही वाचा :
नवरात्रीच्या उपवासात ट्राय करा गूळ मखाणा
- Advertisement -
- Advertisement -