हळदीचा वापर हा प्रत्येक घरात केलाच जातो. केवळ स्वादच नाही तर अनादी काळापासून या मसाल्याचा वापर वेगवेगळ्या कारणांसाठी केला जातो. हळदीमधील अँटीसेप्टिक औषधीय गुण हे अनेक आजारांपासून आपल्याला दूर ठेवण्यासाठी उपयोगी ठरतात. सामान्यतः लोक जेवणातून हळदीचे सेवन करतात. अनेकांना हळदीचे दूध घेण्याची देखील सवय असते. पण तुम्हाला माहित आहे का की हळदीचे पाणी पिणे रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर आहे. चला तर जाणून घ्या हळदीचे पाणी पिण्याचे फायदे आणि ते कसे बनवावे.
जीवाणूंपासून संरक्षण
हळदीच्या पाण्याचे नियमित सेवन केल्याने त्याच्या अँटी-बॅक्टेरियल आणि इम्युनोमोड्यूलेटरी प्रभावामुळे प्रतिकारशक्ती मजबूत होते. हे पाणी शरीराचे संक्रमण, विषाणू आणि जीवाणूंपासून संरक्षण करण्यास मदत करते, ज्यामुळे रोगांचा धोका कमी होतो.
वेट लॉस
जर तुम्हाला तुमचे वाढलेले वजन कमी करायचे असेल तर तुमच्या आहारात हळदीच्या पाण्याचा समावेश करा. रोज हळदीचे पाणी पिण्यामुळे रक्तातील विषारी पदार्थ शरीराबाहेर निघण्यास मदत मिळते. लिव्हरमध्ये जमा होणारे विषारी पदार्थ बाहेर काढून टाकून सेल्स पुन्हा जिवंत करण्यासाठी हळदीच्या पाण्याचा उपयोग होतो. लिव्हरला कोणत्याही इन्फेक्शनचा धोका होत नाही.
मधुमेहामध्ये फायदेशीर
हळदीचे पाणी मधुमेह असलेल्या लोकांसाठी वरदान ठरू शकते. हळदीमध्ये असलेले कर्क्यूमिन रक्तातील साखरेचे प्रमाण सामान्य ठेवून मधुमेहाचा धोका कमी करते.
त्वचेसाठी फायदेशीर
हळदीने नेहमीच त्वचेला फायदा मिळतो. त्यामुळे लग्नाच्या वेळीही हळदीला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले आहे. हळदीचे पाणी नियमित पिण्यामुळे त्वचा अधिक तुकतुकीत दिसते. हळदीच्या पाण्यात लिंबू आणि मध मिक्स करून प्यावे.
कसे बनवावे आणि प्यावे हळदीचे पाणी
- जर तुम्हाला सकाळी रिकाम्या पोटी हळदीचे पाणी प्यायचे असेल तर ते तयार करण्यासाठी प्रथम एक ग्लास गरम पाण्यात चिमूटभर हळद, लिंबू आणि मध घालून चांगले मिक्स करा. आपण हवे असेल तर तुम्ही फक्त हळद आणि पाणी देखील घेऊ शकता.
- हळदीचे सेवन मर्यादित प्रमाणातच करण्याचा सल्ला दिला जातो. याच्या अतिसेवनाने आरोग्याला फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. हळदीचे योग्य प्रमाण जाणून घेण्यासाठी आणि त्याचे आरोग्य फायदे घेण्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Edited By : Nikita Shinde