Thursday, September 21, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Health सांधेदुखीने त्रस्त आहात, मग प्या हळदीचे पाणी

सांधेदुखीने त्रस्त आहात, मग प्या हळदीचे पाणी

Subscribe

भारतीय किचनमध्ये असलेले मसाले पदार्थाची चव वाढवण्यासह आरोग्य उत्तम राखण्यासह ही मदत करतात. त्यापैकीच एक म्हणजे हळद. यामध्ये काही औषधीय गुण आढळतात. यामुळे त्वचेसंबंधित समस्या दूर होतात. या व्यतिरिक्त शरिरातील काही समस्या दूर होण्यास ही फायदेशीर ठरते. (Turmeric water benefits)

हळदीत प्रोटीन, कॅल्शिअम, फायबर, लोह, कॉपर, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन के सारखी पोषक तत्वे असतात. हळदीचे पाणी तुम्हाला शरिरात डिटॉक्सीफाय करण्यास मदत करतात. त्याचसोबत या ड्रिंकमुळे तुम्हाला काही प्रकारचे फायदे होऊ शकतात. तर जाणून घेऊयात हळदीचे पाणी पिण्याचे फायदे.

- Advertisement -

इम्युन सिस्टिम मजबूत होते
हळदीत काही प्रकारचे गुण असतात. त्यात असलेले करक्युमिन रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. त्याचसोबत शरिराला फ्री रेडिकल्सपासून बचाव करतात. जर तुम्ही दररोज हळदीच्या पाण्याचे सेवन करत असाल तर काही प्रकारच्या आजापांसून दूर राहू शकता.

वजन कमी करण्यास फायदेशीर
हळदीचे पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. याच्या सेवनाने मोटाबॉलिज्म उत्तम होतो. त्यामुळे फॅट्स वेगाने कमी होतात.

- Advertisement -

ग्लोइंग स्किनसाठी
हळदीत अँन्टी ऑक्सिडेंट गुण असतात. जे त्वचेला चमक देण्यास मदत करतात. याचे सेवन केल्याने तुमची स्किन हेल्दी राहू शकते.

सांधेदुखीची समस्या दूर होते
हळदीत अँन्टी इंफ्लेमेंटरी गुण असतात. त्यामुळे सांधेदुखीची समस्या दूर होऊ शकते.

असे तयार करा हळदीचे पाणी
सर्वात प्रथम एका पॅनमध्ये पाणी घ्या. ते उकळण्यासाठी गॅसवर ठेवा. त्यानंतर त्यात एक टी स्पून हळद पावडर मिक्स करा आणि काही वेळाने गॅस बंद करा. हवं असल्यास यामध्ये लिंबूचा रस आणि मध मिक्स करु शकता.


हेही वाचा- पोटात गॅस तयार करतात ‘या’ डाळी

- Advertisment -

Manini