Thursday, September 28, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Relationship Twins Baby- जुळ्या बाळांना असते एक्स्ट्रा काळजीची गरज

Twins Baby- जुळ्या बाळांना असते एक्स्ट्रा काळजीची गरज

Subscribe

लोक बहुतांश वेळा असे म्हणतात की, जुळ्या मुलांना सांभाळणे म्हणजे भाग्याचे काम. एकत्रित जुळ्या मुलांची काळजी घेणे एक टास्कच असते. खासकरुन त्या पालकांसाठी जे जॉइंन्ट फॅमिलित राहतात. याचे मुथ्य कारण असे असते की, ट्विन्स बाळांना अटेंशनची गरज असते. त्यांच्या खाण्यापिण्यापासून ते झोपण्यापर्यंतच्या सर्वच गोष्टींकडे पहावे लागते. हे सुद्धा पालकांसाठी फार मेहनतीचे काम असते. अशातच तुम्ही काही गोष्टींची काळजी घेऊन तुमचे काम सोप्पे करु शकता. (Twins baby care tips)

रुटीन बनवणे गरजेचे
जर तुम्हाला ट्विन्स बेबी असाल तेव्हा सर्वात प्रथम त्यांचे रुटीन सेट करा. अशातच तुम्ही मुलांसाठी प्रत्येक कामाचे एक टाइमटेबल ठरवा. यामध्ये मुलांना खाण्यापिण्यापासून ते झोपेपर्यंतचे टाइमटेबल सेट करा. अशा प्रकारे रिकाम्या वेळी तुम्ही तुमची अन्य महत्वाची कामे पूर्ण करु शकता.

- Advertisement -

परिवाराची मदत घ्या
जर तुम्ही सिंगल फॅमिलित रहात असाल तर त्यांच्या पालनपोषणाबद्दल विचार करणे सहाजिकच आहे. अशावेळी तुम्ही तुमच्या परिवाराची मदत घेऊ शकता. जर घरातील लोकांची मदत घेणे शक्य नसेल तर त्यांना बेबी सीटर मध्ये सुद्धा ठेवू शकता.

- Advertisement -

ब्रेक घेणे सुद्धा गरजेचे
जुळ्या मुलांची देखभाल करतेवेळी पालकांना स्वत:ला मानसिक हेल्दी ठेवणे फार महत्वाचे असते. कधी कधी थकवा आणि ताण आल्यानंतर चिडचिड होते. अशा स्थितीपासून दूर राहण्यासाठी काही वेळेस स्वत:साठी काढणे फार महत्वाचे असते. असे केल्याने फ्रेश वाटतेच पण मुलांची काळजी ही व्यवस्थितीत घेतली जाते.(Twins baby care tips)

सोशल मीडियाची मदत घ्या
जुळ्या बाळांची काळजी घेण्यासाठी तुम्हाला एखादी समस्या येत असेल तर तुम्ही सोशल मीडियाची मदत घेऊ शकता. यासाठी तुम्ही एक्सपीरियंस मदर्स किंवा फादर्सशी बोला. अशातच तुम्हाला बाळांची देखभाल कशी करावी याच्या उत्तम टीप्स तुम्हाला मिळेल.


हेही वाचा- मुलांना Mentally Strong बनवायचे असेल तर पालकांनी ‘या’ चुका करु नये

 

- Advertisment -

Manini