Tuesday, January 21, 2025
HomeमानिनीTypes Of Hugs: मिठीचे प्रकार आणि त्याचा अर्थ

Types Of Hugs: मिठीचे प्रकार आणि त्याचा अर्थ

Subscribe

प्रेमात पडलेल्या प्रत्येकाला स्वप्नांच्या दुनियेत नेणाऱ्या मिठीचं महत्त्व माहीत आहे. प्रेमाने मारलेलं ते आलिंगन, त्यातील प्रत्येक स्पर्श गुलाबी विश्वात नेणारा असतो. जेव्हा प्रेम व्यक्त करण्यासाठी शब्द सुचत नाही तेव्हा प्रियजनांना घट्ट मिठी मारली जाते. मिठी मारून प्रेम, आपुलकी, काळजी व्यक्त केली जाते. एका मिठीमुळे समोरच्याला तुम्हाला काय म्हणायचे आहे हे सहजपणे न बोलताही कळते. साधारण: मिठी म्हणजे आलिंगन जे आपण समोरून करतो. पण, तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल मिठीचे अनेक प्रकार आहेत. या प्रत्येक मिठीला अर्थही आहे, जो आपल्याला समोरच्याचा भावना स्पर्शाने आणि मिठीच्या प्रकाराने दशर्वितो. चला तर मग जाणून घेऊयात, मिठीचे प्रकार आणि त्याचा अर्थ

बाजूने मारलेली मिठी (Side Hug)

साइड हग हे नम्रता आणि मैत्रीचे प्रतिक मानले जाते. साइड हग आपण अशा व्यक्तींना करतो, जे आपल्यासाठी जवळचे व्यक्ती असतात, ज्यांच्याजवळ आपण मनमोकळेपणाने बोलतो. पण, ती व्यक्ती आपली प्रियकर, प्रेयसी असू शकत नाही. पण, समजा कधीतरी तुमचा प्रियकर किंवा प्रेयसी जर तुम्हाला अशी मिठी मारत असेल तर तुम्ही स्वत:ला नशीबवान समजायला हवे, कारण त्या व्यक्तीत तुम्हाला प्रियकरासोबत मित्रही मिळाला आहे.

पाठीमागून मिठी मारणे (Back Hug)

पाठीमागून जी मिठी मारली जाते, ती अचानक मारली जाते. या मिठीचा अर्थ खूप खोलवरच्या भावना असते. पाठीमागून मिठी मारणे म्हणजे दोन व्यक्ती एकमेकांवर खूप जीवापाड प्रेम करतात, असा होतो. प्रेम व्यक्त करण्यात जेव्हा शब्द कमी पडतात तेव्हा पाठीमागून मारलेली मिठी सर्व काही सांगून जाते.

कंबरेला मिठी मारणे 

कंबरेला मिठी मारणे ही एक रोमॅंटिक मिठी असते. जेव्हा कंबरेला मिठी मारली जाते तेव्हा पार्टनरला हालचाल करता येत नाही. या मिठीचा दुसरा अर्थ असा असतो की, तुम्ही एकमेकांसोबत कंफर्टेबल आहात.

घट्ट मिठी 

हृदयापासून मारलेली मिठी ही अंगावर रोमांच उभे करणारी असते. या मिठीत प्रेम आणि काळजी या दोन्ही गोष्टी असतात.  जर तुमचा पार्टनर तुम्हाला अशीच मिठी मारत असेल तर तो तुमचा कायम आदर करणारा, जीवापाड प्रेम करणारा, भावना समजून घेणारा आहे असे समजावे.

मिठीचे फायदे –

  • 10 ते 20 सेकंदाची मिठी हृदय आणि एकूण आरोग्यासाठी फायदेशीर असते.
  • एका मिठीमुळे आपला मूड बदलतो. खरंतर, असे वाटण्यामागे कारण आहे. मिठी ऑक्सीटोसिन सोडते. ऑक्सीटोसिन हे लव्ह हार्मोन म्हणून ओळखले जाते. ज्यामुळे तुमचा मूड बदलतो, तुम्ही आनंदी होता.
  • तज्ञांच्या मते, आजारी पडलेला व्यक्ती लवकर बरा होतो.

 

 

 

हेही पाहा –


Edited By – Chaitali Shinde

Manini