Sunday, June 11, 2023
घर मानिनी Relationship Unconditional Love तुमचं नातं अटी शर्थीवर टिकलयं की प्रेमावर ? असं ओळखा

Unconditional Love तुमचं नातं अटी शर्थीवर टिकलयं की प्रेमावर ? असं ओळखा

Subscribe

नाते निस्वार्थ असेल समोरच्याला तुमच्याकडून आणि तुम्हाला त्याच्याकडून प्रेमाव्यतिरिक्त कसल्याही अपेक्षा नसतील तर त्यातल्या भावनाही तेवढ्याच प्युअर असतात  त्याला अनकंडीशनल unconditional प्रेम असं म्हणतात.

नाते निस्वार्थ असेल समोरच्याला तुमच्याकडून आणि तुम्हाला त्याच्याकडून प्रेमाव्यतिरिक्त कसल्याही अपेक्षा नसतील तर त्यातल्या भावनाही तेवढ्याच प्युअर असतात  त्याला अनकंडीशनल unconditional प्रेम असं म्हणतात. पण जर समोरची व्यक्ती तुमच्याकडून प्रेमाच्या मोबदल्यात कसली अपेक्षा ठेऊन असेल तर वेळीच सावध व्हा. प्रेमाच्या या दोन्ही प्रकारांमधला फरक ओळखायला शिका.

निस्वार्थ प्रेम

- Advertisement -

एकमेकांची काळजी घेणे, एकमेकांच्या भावनांचा मताचा आदर करणं कठीण काळात जोडीदाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे म्हणजे खरं प्रेम. तुमच्या नात्यात जर अशाच भावना असतील तर तुम्ही योग्य व्यक्तीच्या जवळ आहात असे समजा.

- Advertisement -

हवी हवीशी सेफ सोबत

जर तुम्ही अशा व्यक्तीबरोबर आहात जिच्या सहवासात तुम्ही तुमचे प्रॉब्लेम विसरून जाता तर तुम्ही योग्य ट्रॅकवर आहात. तसेच ज्या व्यक्तीचा तुम्हांला जास्तीत सहवास हवा हवासा वाटतो तसेच ज्याच्याबरोबर सर्वात जास्त सुरक्षित वाटतं ती व्यक्ती तुमची योग्य जोडीदार आहे हे समजून जा.

समान विचार

जर तुमच्या दोघांमधील चर्चेचे विषय एकाच उत्तरावर येऊन थांबत असतील तर तुमचे विचार जुळतात हे समजायला हरकत नाही.

 

- Advertisment -

Manini