हल्ली सोलो ट्रिपचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत आहे. पुरुषांसह आता महिलाही पर्यटनासाठी सोलो ट्रिपचा प्लॅन करतात. पर्यटनासाठी अनेक देशांमध्ये जाण्याचा विचार केला जातो. पण, अशावेळी आपण जात असलेला देश महिलांसाठी किती सुरक्षित आहे, याची माहिती घेणंही महत्त्वाचं आहे. कारण दिवसेंदिवस महिलांसंबंधित गुन्हांचे प्रमाण वाढत आहेत, महिला असुरक्षित असणे ही मोठी समस्या बनली आहे. अशावेळी परदेशी पर्यटनाला जाताना योग्य ती खबरदारी घेणं आवश्यक आहे. त्यामुळे आज आम्ही महिला पर्यटकासाठी जगातील कोणते देश असुरक्षित आहेत याची यादी घेऊन आलो आहोत. चला तर मग जाणून घेऊयात, महिला पर्यटकांसाठी असुरक्षित असणारे देश
दक्षिण आफ्रिका –
महिला पर्यटकांसाठी सर्वात असुरक्षित देशांच्या यादीत दक्षिण आफ्रिका सर्वात अव्वल स्थानावर आहे. येथील स्थानिक महिलांनाही रात्रीच्यावेळी एकट्याने चालणे असुरक्षित वाटते. या देशात महिलांच्या हत्या जास्त प्रमाणात होतात.
ब्राझील –
ब्राझील हा देश पर्यटनसाठी खूप जास्त प्रमाणात निवडण्यात येतो. पण महिला पर्यटकांसाठी ब्राझील देश असुरक्षेच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
रशिया –
महिलांसाठी रशिया हा देश धोकादायक सांगण्यात येतो. येथे महिलांचे जास्त प्रमाणात खून करण्यात येतात. येथे तुम्ही जर पर्यटनासाठी जाणार असाल तर सावधगिरी बाळगली पाहिजे.
मेक्सिको –
मेक्सिको देश महिला पर्यटकांसाठी असुरक्षित देशांमध्य़े चौथ्या क्रमांकावर आहे. येथे महिला हिंसाचाराचे प्रमाण खूप जास्त प्रमाण आहे.
इराण –
महिला पर्यटकांसाठी धोकादायक देशांमध्ये इराण पाचव्या क्रमांकावर आहे. या देशात लैंगिकतेच्या आधारावर भेदभाव केला जातो.
इजिप्त –
इजिप्त देश महिला पर्यटकांसाठी असुरक्षित मानला जातो. येथे तुम्ही जर पर्यटनासाठी जाणार असाल तर सावधगिरी बाळगली पाहिजे.
मोरोक्को –
महिला पर्यटकांच्या असुरक्षिततेमध्ये मोरोक्को देश आठव्या क्रमांकावार आहे. येथे तुम्ही जर पर्यटनासाठी जाणार असाल तर सावधगिरी बाळगायला हवी.
भारत –
आपला भारत देशही या यादीत नवव्या क्रमांकावर आहे. दिवसेंदिवस भारतात हिसांचाराचे प्रमाण वाढत आहे.
थायलंड –
महिला पर्यटकांसाठी धोकादायक असणाऱ्या देशांमध्ये थायलंड दहाव्या क्रमांकावर आहे. येथे जोडीदाराकडून होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण अधिक आहे.
हेही वाचा :