Saturday, September 30, 2023
घर मानिनी Health Upper Body च्या बळकटीसाठी करा 'या' एक्झरसाइज

Upper Body च्या बळकटीसाठी करा ‘या’ एक्झरसाइज

Subscribe

अप्पर बॉडी स्ट्रेंथचा असा अर्थ होतो की, छाती, पाठ, खांदे, हात आणि कोर मसल्स मजबूत करणे. यामध्ये हाय इंटेससिटीसारख्या एक्झरसाइज केल्या जातात. तसेच जर अप्पर बॉडी अधिक मजबूत बनवायची असेल तर बॉडी स्ट्रेंथ स्टेबिलिटी, बॅलेन्स मध्ये सुधार केले पाहिजे. पाठ आणि खांद्यांच्या मदतीने तुम्हाला यामध्ये काही एक्झरसाइज केल्या जातात. अशातच तुम्हाला सुद्धा अप्पर बॉडीसाठी बळकटी द्यायची असेल तर पुढील काही एक्झरसाइज तुम्ही करू शकता. (Upper body strengthening exercise)

-पुश-अप्स

- Advertisement -


हात आणि खांद्याच्या मदतीने तुम्ही पुश अप्स करु शकता. सुरुवातीला पुश अप्स करणे कठीण होईल. त्यामुळे तुम्ही भिंतीला हात लावून पुश अप्सची प्रॅक्टिस करू शकता.

-बेंच प्रेस

- Advertisement -


बेंच प्रेसमध्ये तुम्हाला त्यावर पाठीच्या आधारावर झोपायचे असते. आता तुमच्या हाताने डंबल्स हे वरच्या दिशेने नेल्यानंतर हळूहळू खाली आणायचे असतात. ही एक्झरसाइझ करताना तुमच्या मानेवर अधिक ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी.

-ओवरहेड प्रेस


ही एक्झरसाइज करण्यासाठी तुम्हाला उभे रहावे लागणार आहे. यामध्ये बारबेल किंवा डंबल्स खांद्यापासून एका उंचीवर पकडा. जो पर्यंत तुमचे आर्म्स पूर्णपणे सरळ रेषेत येत नाहीत तो पर्यंत तो वरच्या बाजूला धरुन ठेवा. त्यानंतर हळूहळू खाली आणा. ओव्हरहेड प्रेसमुळे खांदे, ट्राइसेप्स आणि कोर स्टेबिलिटी वाढली जाते.

-डिप्स


ही एक्झरसाइज करण्यासाठी तुम्ही एखाद्या बेंचची मदत घेऊ शकता. तुमचे हात मागील बाजूस घेऊन जात बेंचवर ठेवा. तुमचे पाय हे काटकोनात असावे. असे केल्यानंतर हाताच्या सहाय्याने तुमचे शरिर वर-खाली नेण्याचा प्रयत्न करा.


हेही वाचा- वेगाने वजन कमी करण्यासाठी खा ‘ही’ Low Calories फळं

- Advertisment -

Manini